सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. मुंबई यांच्या
सोलापूर शाखेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व सभासद सहकार प्रशिक्षण व पाल्य गुणगौरव सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री मा. आमदार श्री. सुभाष ( बापू ) देशमु व. पुणे विभाग शिक्षक मतदार संघ मा. आमदार श्री. दत्तात्रय सावंत हे होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. मुंबई संचलित सोलापूर शाखेच्या नूतन इमारत व विश्रामगृहाचे उद्घाटन संपन्न झाले.
संस्थेने उभारलेल्या. या विश्रामगृहाचा राज्यभरातून तुळजापूर, पंढरपूर, सोलापूर या तीर्थक्षेत्री येणार्या सभासदांना फायदा होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत बाजीराव पाटील तसेच सचिव किशोर मुरलीधर पाटील, सहसचिव श्री. सतीश ज्ञानदेव माने, खजिनदार श्री. सतेश शहाजी शिंदे, संचालक श्री. पांडुरंग ज्ञानदेव कणसे, श्री. भाऊसाहेब रामभाऊ आहेर, श्री. जगन्नाथ तुकाराम जाधव श्री. गोविंद आबाजी सूळ संचालिका सौ. जयश्री गव्हाणे व पालक संचालक श्री. प्रमोद ( पप्पू ) देशमुख तसेच मा. चेअरमन बाळे पतसंस्था श्री. समाधान घाडगे, श्री. सुभाष भीमणवरु, श्री. गुरुनाथ वांगीकर अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती, संपर्कप्रमुख श्री. शंकर वडने, श्री. बापू दळवी, श्री. सारंग पाटील, श्री. राजशेखर चौधरी मुख्याध्यापक बिराजदार, चणबसप्पा बिराजदार, राजकुमार कस्तुरे, श्री. मस्के सर, श्री. डुरे सर, श्री. श्री. शकील अन्सारी सर, सरदार नदाफ सर, श्री. तोडकरी सर, श्री. शिवानंद तेगनगीरी सर, मुख्याध्यापक श्री. मोहम्मद शेख, श्री. पवन सुतार सर, श्री. भोईटे सर, श्री. अशोक बगले सर, मुख्याध्यापक सुरेश नेल्लूरे सर व सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रमाची प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन श्री. चंद्रकांत पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन श्री. दत्तात्रय मोकाशी सर व श्री. सत्यवान माळी यांनी केले व सहसचिव श्री. सतीश माने सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
More Stories
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!
बार्शी येथे मनशक्ती प्रयोग केंद्राची आरोग्यप्राप्ती, रोगमुक्ती कार्यशाळा संपन्न