पुणे भारताच्या स्वातंत्र्याचे 75 वर्षे हे औचित्य साधून इंडो ऍथलेटिक सोसायटीचे 75 सदस्य पुणे ते कन्याकुमारी हे 1600 किमीचे मोठे अंतर सायकल वर यशस्वी पणे पार केले, ११ डिसेंबर ते शुक्रवार २१ डिसेंबर असा दहा दिवसांचा प्रवास करणारी आय ए एस हि देशातील प्रथम व इतक्या मोठ्या संख्येने सायकल वर १६०० यानंतर पार करणारी ही आपल्या देशातील एकमेव सर्वात लांब राइड ठरली आहे.
निगडी येथील भक्ती शक्ती उद्यान येथे सर्व जमले होते त्या वेळी उद्योजक अण्णा बिरादर, तात्यासाहेब शेवाळे, प्रसिद्ध बिल्डर अरुण डेव्हलपर्स, निर्माण ग्रीन्स, कन्स्ट्रक्टोकेअर ग्रुप, युनिक स्पेस, दिल्ली गुजरात फ्लीट कॅरिअर्स प्रायव्हेट लिमिटेड, शेवाळे अँड कंपनी, सह्याद्री इंडस्ट्रीज, आयएएस चे गजानन खैरे, गणेश भुजबळ, अजित पाटील यांच्यातर्फे झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. दहा दिवसाचा प्रवासात रोज पहाटे साडे चार वाजता सुरुवात होत होती.
दिवस १ – पुणे ते कराड – १८१ किमी
दिवस २ – कराड ते बेळगाव – १७९ किमी
दिवस ३ – बेळगाव ते येल्लापूर – १५४ किमी
दिवस ४ – येल्लापूर ते मुरुडेश्वर – १३८ किमी
दिवस ५ – मुरुडेश्वर ते मंगलुरू – १५७ किमी
दिवस ६ – मंगलुरू ते थलासेरी – १६४ किमी
दिवस ७ – थलासेरी ते गुरूवायूर– १६६ किमी
दिवस ८ – गुरूवायूर ते अलेप्पी– १३८ किमी
दिवस ९ – अलेप्पी ते तिरुअनंतपुरम – १४६ किमी
दिवस १० – तिरुअनंतपुरम ते कन्याकुमारी – १०० किमी
पुणे ,पिंपरी चिंचवड, मावळ परिसर तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातून सायकल प्रेमींनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. दहा दिवसांच्या प्रवासात पुणे – कराड – बेळगाव – येल्लापूर – मुरुडेश्वर –मंगळूर – थलासेरी – गुरुवायूर – अलप्पुझा – तिरुवनंतपुरम –कन्याकुमारी अशी ठिकाणे समाविष्ट आहेत. सर्व रायडर्स दररोज 170 180 किमी अंतर पेडलिंग केले , दरम्यान कात्रज, खंबाटकी, तवांडी व बेळगाव चा आधी वंतामुरे घाट आव्हानात्मक घाट लागले होते सदर ठिकाणी उलट दिशेने येणाऱ्या वाहनांचा त्रास झाला. मुरुडेश्वर पुढे किनारपट्टीचा भागातून सायकल चालवण्याचा आनंद घेता आला. तसेच ५० किलोमीटरचाकर्नाटक येथील घनदाट जंगल प्रवास देखील कसोटी पाहणारा ठरला असे इंडो ऍथलेटिक सोसायटीचे संस्थापक गजानन खैरे यांनी सांगितले.
पुणे ते कन्याकुमारी राईड चा नियोजनामध्ये इंडो अथलेटिक्स सोसायटीचे मुख्य सल्लागार अजय दरेकर, प्रमोद चिंचवडे , मदन शिंदे, गिरीराज उमरीकर, अजित गोरे, रमेश माने, श्रीकांत चौधरी , सुशील मोरे, अमीत पवार , प्रतीक पवार, अविनाश चौगुले , रवी पाटील , संदीप लोहकर, मंगेश दाभाडे , बळीराम शिंदे, दादासाहेब आगळे, शिवाजीराव काळे, श्रीमंत शिंदे , संजय देशमुख, गजेंद्र ननावरे, गोविंद घाटकर , प्रशांत तायडे, दीपक नाईक, प्रणय कडू आदींनी मोलाचे सहकार्य केले, तर भानुदास पोतदार , महादेव पाटील, अभिनंदन केसरकर, स्वप्नील लोढा, अमित अगरवाल, दीलीप डेबेकर, आशिष सोलाओ , अभय खटावकर, दत्तात्रय मेंदुगडे, प्रभाकर पवार, राहुल जाधव, रविराज कुलकर्णी, मंगेश भुजबळ, राहुल आढाव, सुनील तपासे , अथर्व जाधव , चिन्मय पाटील, सुजित मेनन, माधवन स्वामी, सुनील हत्ते , विजय जगताप, रामदास अण्णा चौधरी, संतोष चिंचवडे , संतोष टोणपे, नितीन पानसे, रमेश खाडे, सचिन तंमणे, श्रेयस पाटील, सुरेश पाठगावे, नितीन पवार, योगेश तावरे, योगेश कौशिक आदी सायकलस्वार सहभागी झाले होते. पुणे मध्ये नागरकॉइल एक्सप्रेस ने आल्या वर पुणे रेल्वे अधिकारी श्री एस सी जैन, स्टेशन डायरेक्टर पुणे ने स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कदम, मुख्य कार्यालय अधीक्षक यांनी केले, या वेळी अजय सिन्हा, रमेश नायर, अर्चना शिंदे, गणेश शेट्टनितिन भगत, तुषार पातोडे, संदीप दोशी, राजेश गायकवाड़ उपस्थित होते. तसेच सर्वां सायकल स्वरांचे घरी व सोसायटी मध्ये जोरदार स्वागत झाले.
पुणे ते कन्याकुमारी ही सर्व सायकलस्वारांसाठी स्वप्नवत राईड होती. या महान राईडमध्ये सहभागी असलेल्या सर्वांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी IAS सर्व आवश्यक काळजी घेतली. आवश्यक लसीकरण व RTPCR चाचणी घेतल्या होत्या. सर्वाना प्रोटीन ब्रॉड लीफ हेल्थकेअर यांच्या सहकार्याने तर GPS ट्रेकर रामकी टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड तर्फे देण्यात आले होते.
CDS जनरल बिपिन रावत यांचा अपघात झालेल्या तामिळनाडू मधील हेलिकॉप्टर अपघातातील बळींना IAS ही राइड समर्पित करते. महाराष्ट्र , कर्नाटक , केरळ व तामिळनाडू या सर्व राज्यातील लोकांचे प्रेम मिळाले , आपुलकीने सर्व चौकशी करत होते , त्यांना आमचा मोहिमे बद्दल खूप उत्सुकता आणि विशेष वाटत होते. बराच वेळा लोकांनी आपल्या घरी येण्यास आग्रह केला परंतु पुढील प्रवास समोर असल्याने आम्ही ते टाळले अश्या रीतीने प्रथमच पुणे ते कन्याकुमारी हा देशाचा इतिहासातील पहिलीच सर्वात मोठी ग्रुप राईड ठरली आहे.
More Stories
ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन, १७ खेळाडूंना शूज जोड्यांचे वाटप
श्री शिवाजी महाविद्यालयाच्या पाच खेळाडूंची विद्यापीठ संघात निवड
सेंट जोसेफ स्कूल बार्शीच्या ध्रुव पाटील याची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड