Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > मुदती संपणाऱ्या व नविन नगरपरिषदांच्या निवडणुकांकरिता प्रभाग रचनेचे कच्चे प्रारूप तयार करण्याचे निर्देश

मुदती संपणाऱ्या व नविन नगरपरिषदांच्या निवडणुकांकरिता प्रभाग रचनेचे कच्चे प्रारूप तयार करण्याचे निर्देश

मित्राला शेअर करा

मुदती संपणाऱ्या व नवनिर्मित नगरपरिषदांच्या निवडणुकांकरिता प्रभाग रचनेचे कच्चे प्रारूप तयार करण्या बाबतचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकारी ( मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून ) यांना दिले आहेत.

राज्यातील यापूर्वी मुदत समाप्त झालेल्या व माहे डिसेंबर , 2021 ते फेब्रुवारी , 2022 या कालावधीत मुदत समाप्त होणाऱ्या अ , ब व क वर्गातील नगरपरिषदांची कच्ची प्रभाग रचना शासनाच्या दि .01 ऑक्टोबर , 2021 च्या अध्यादेशातील तरतुदीनुसार ( बहुसदस्यीय प्रभाग पध्दती नुसार ) तयार करुन ठेवण्याबाबत सदर कार्यालयांना कळविण्यात आले होते .

राज्य शासनाने अध्यादेश काढून ” अ ” वर्ग नगरपरिषदेसाठी निवडून आलेल्या परिषद सदस्यांच्या संख्येमध्ये 2 ने वाढ केली आहे . तसेच ” अ ” वर्ग नगरपरिषदेमध्ये किमान सदस्य संख्या 40 असेल आणि 75 पेक्षा अधिक नसेल , ” ब ” वर्ग नगरपरिषदेसाठी निवडून आलेल्या परिषद सदस्यांच्या संख्येमध्ये 2 ने वाढ केली आहे . ” ब ” वर्ग नगरपरिषदेसाठी किमान सदस्य संख्या 25 असेल आणि 37 पेक्षा अधिक नसेल . ” क ” वर्ग नगरपरिषदेसाठी निवडून आलेल्या परिषद सदस्यांच्या संख्येमध्ये 3 ने वाढ केली आहे . ” क ” वर्ग नगरपरिषदेसाठी किमान सदस्य संख्या 20 असेल आणि 25 पेक्षा अधिक नसेल .

या अध्यादेशातील तरतुदीनुसार वरील प्रमाणे नमूद केल्यानुसार सदस्य संख्या निश्चित करुन त्यानुसार कच्ची प्रभाग रचना कोणत्याही परिस्थीत दि .30 / 11 / 2021पूर्वी तयार करुन ठेवावी व त्याबाबत आयोगास आवगत करण्यात यावे असे आदेश. मा.राज्य निवडणूक आयुक्त यांनी संबंधित जिल्हा प्रशासन अधिकारी व नगरपरिषदांचे चे मुख्याधिकारी यांना
दिले आहेत.