साध्य तापमानात प्रचंड वाढ झाली असून उन्हात कोरड्या पडलेल्या घश्याला ओलावा मिळावा म्हणून ज्या ठिकाणी ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये येतात व जे नागरिक सहज व सोप्या पद्धतीने पाणी बॉटल घेऊ शकत नाहीत, आशा गरजू नागरिकांसाठी बार्शीतील जय शिवराय प्रतिष्ठानच्या या विविध उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सामाजिक संस्थेच्या तसेच सहकारीदूत श्री ऋषिकांत पाटील व पाणीदूत श्री बाबासाहेब बारकुल यांच्या सहकार्यातून छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा जगदाळे मामा हॉस्पिटल येथे पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत.

यामध्ये पाणपोई क्रमांक १ तहसील कार्यालय बार्शी येथे तसेच पाणपोई क्रमांक २ चे लोकार्पण वृक्ष संवर्धन समिती सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी जय शिवराय प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.
More Stories
बार्शीच्या शहाजी फुरडेंचा व्हिएतनाममध्ये सन्मान, विमा व्यवसायातील MDRT चा विशेष बहुमान
नांदेड-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस’चा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ
डॉ. प्रविण मस्तुद यांच्या “मराठी भाषिक व्यंगचित्र पत्रकारितेचा इतिहास” या पुस्तकास चक्रधर स्वामी राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार