दिंडी सोहळा
ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वाणी यांच्या घरी श्री. संत गजानन महाराज संस्थान शिवनी पिसा ते पंढरपूर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथील दिंडी चे आगमन झाले असून या दिंडीसाठी ओन्ली समाजसेवा बहूउद्देशीय च्या माध्यमातून महाप्रसादाचे आयोजन केले होते
या कार्यक्रमास बार्शी नगर परिषदेचे सी. ओ माननीय बाळासाहेब चव्हाण साहेब यांच्या हस्ते पुजा करण्यात आली गजानन महाराज दिंडी प्रमुख तसेच माऊली मदन पाटील महाराज यांचा यावेळी सत्कार करण्यात आली याप्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित असून सर्व मान्यवरांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला.
महाआरती झाल्यानंतर सर्व वारकरी यांना संस्थेच्या वतीने भोजन देण्यात आले
सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी बोलताना माऊली मदन पाटील महाराज यांनी आपल्या भावना व्यक्त करताना आमचा यशोचित सन्मान व जेवणाची उत्तम प्रकारे सेवा दिली त्याबद्दल संस्थेचे कार्य यापुढेही आमच्या स्मरणात राहील असे संस्थेचे
अध्यक्ष राहुल वाणी यांच्याशी बोलताना भावना व्यक्त केल्या त्याचबरोबर या दिंडी सोहळ्यास माननीय बाळासाहेब चव्हाण हे उपस्थित राहिले त्याबद्दलही त्यांचे आभार व्यक्त केले.
प्रत्येक वर्षी आपल्या दिंडीची सेवा करण्यात साठी आम्ही सदैव सेवा करण्यास तयार आहोत अशी भावना संस्थेच्या अध्यक्ष राहुल वाणी यांनी बोलून दाखवली त्यानंतर दिंडी मार्गस्थ झाली यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी सन्माननीय सदस्य महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
More Stories
प्रिसिजन वाचन अभियानगुरुवार दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी!
धर्मरक्षक प्रतिष्ठान व स्वराज्य संघटनेचा उपक्रम कौतुकास्पद : संकल्प ऐतिहासिक वास्तू , पुरातन मंदीरे व गडकोट यांचे जतन व संवर्धन
बार्शीत हिरकणी ग्रुपच्या “श्रावण” सरी’त महिला चिंब..!श्री संस्कृती ग्रुप, सुलभा घुबे, अमृता खंदाडे प्रथम