Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > महाराष्ट्र > महाराष्ट्र नाभिक महामंडल शिरपुर च्या वतीने शहर तालुका व जिल्हा स्तरीय कार्यकारिणी जाहिर

महाराष्ट्र नाभिक महामंडल शिरपुर च्या वतीने शहर तालुका व जिल्हा स्तरीय कार्यकारिणी जाहिर

मित्राला शेअर करा

शिरपुर शहरातील करवंद नाका परिसरातील शंकर नाना लॉन्स येथे महाराष्ट्र नाभिक महामंडल, शिरपुर आयोजित शहर,तालुका व जिल्हा स्तरीय नाभिक समाजातील होतकरु बाँधवांना भव्य पद वितरण सोहळा चे कार्यक्रम दि. 8/1/2022 रोजी संपन्न झाला

या कार्यक्रमाचे आयोजन धुळे जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र येशी व धुळे महिला जिल्हाध्यक्ष सौ. हेमलता येशी यांच्या वतीने करण्यात आले होते सदर कार्यक्रमात महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे धुळे जिल्हा अध्यक्ष भिमराव वारुळे सचिव बि .के. सुर्यवंशी, विभागीय संपर्क प्रमूरव किशोर सुर्यवंशी जळगाव जिल्हा महिला अध्यक्ष संगीता गवळी राजकुमार गवळी मनोहर खोंडे सर बंटीनेर पगारे इत्यादी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात पदाधिकारी निवडी जाहीर करण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरचंद देवाराम सोनवणे होते तसेच विभागीय कार्याध्यक्ष कथ्यू आण्णा, वाहिव्या विहिर, किशोर दादा हिरे तळोदा धनराज वरसाळे नंदूरबार शामराव येशी सचिव शहादा मधूकर दादा सेन शिरपूर तसेच महाराष्ट्र नाभिक महामंडळच्या वतीने सेनपरिवाराची लाडकी कन्या कु. प्रियंका मधूकर सेन यांचा जन्मदिव साजरा करण्यात आला कार्यमालामोलाचे सहकार्य दादासाहेब विकास सेन यांचे लाभले मनोगत यशवंत निकवाडे सर मनोहर पाटील सर नामदेव अहिरे सुत्र संचलन मनोहर माधवराव खोंडे सर यांनी केले तर. आभारप्रदर्शन उपाध्यक्ष रामचंद्र येशी यांनी केले शेवटी सुरुची भोजनाचा कार्यक्रम झाल्या नंतर कार्यक्रमाची समाप्ती झाली kranti-news.in

मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील तालुक्यातील व जिल्ह्यातिल नाभिक समाजाची अविरत सेवा करणारे उत्कृष्ट नाभिक समाज बांधवांना त्यांच्या योग्यतेनुसार विभिन्न पदावर नियुक्ती करण्यात आली.