महिलेची सापडलेला मोबाईल व पर्स व इतर ऐवज परत दिला
बार्शी : भिम नगर चौक येथे रिक्षातून प्रवास करत असताना एका महिलेची पर्स पडली त्या पर्स मध्ये १५,००० रुपयांचा स्मार्ट फोन आणि रोख रक्कम ६,००० रुपये व तसेच कानातील सोन्याचे दागिने असा एकुण २५ ते ३० हजार रुपयांचा मुद्देमाल पर्समध्ये होता.
भिमनगर मधील सिद्धार्थ तरुण मडळाचे कार्यकर्ते दत्ता बोकेफोडे , बार्शी नगर पालिकेचे कर्मचारी सचिन बसवंत, शशिकांत चव्हाण, सचिन सोनवणे, रणजीत सोनवणे आदींनी आदर्श नगर, नागणे प्लॉट येथील सायरा जल्लाउद्दीन शेख या महिलेची सर्व रक्कम आणि वस्तू सुखरूप परत केल्या. सिद्धार्थ तरुण सदर महिलेची पर्स दिल्याबद्दल भीमनगर मंडळाचे कार्यकर्ते दत्ता बोकेफोडे, बार्शी येथील तरुणांचे कौतुक केले जात आहे.
More Stories
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत
तेर येथील नृसिंह नवरात्र महोत्सवाच्या रक्तदान शिबिरात 67 भक्तांचे रक्तदान
महाराष्ट्र विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती धावणे के.डी.मॅडम यांना ‘लायन्स क्लब बार्शी रॉयल तर्फे राष्ट्र शिल्पकार आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान