निवडणुक कार्यक्रम जाहीर उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी फेब्रुवारी महिन्यात मतदान
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून 15 संचालक मंडळाच्या जागांसाठी फेब्रुवारी महिन्यात मतदान होणार आहे. निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी हा निवडणुक कार्यक्रम जाहीर केला असून 20 फेब्रुवारीला मतदान तर 21 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 15 संचालक मंडळाची निवडणुक होणार आहे . प्राथमिक कृषी पतपुरवठा व विविध कार्यकारी सेवा सोसायटी संस्था मतदार संघात 8 संचालक असणार आहेत. उस्मानाबाद, तुळजापूर, भूम, परांडा, उमरगा, लोहारा, कळंब व वाशी या 8 तालुक्यातून प्रत्येकी 1 जागा असणार आहे . 2 जागा या महिला प्रतिनिधी , अनुसूचित जाती व जमाती M 1 इतर मागास प्रवर्ग 1 भटक्या विमुक्त जाती व मागास प्रवर्ग 1 इतर शेती संस्था 1 व नागरी बँका आणी इतर संस्था गटातून 1 असे एकूण 15 संचालक मंडळाच्या जागासाठी मतदान होणार आहे
18 जानेवारी ते 24 जानेवारी या काळात सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. सात दिवस उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून 25 जानेवारी रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे . 27 जानेवारी रोजी दाखल उमेदवार यांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे . 27 जानेवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. 11 फेब्रुवारी रोजी चिन्ह वाटप व उमेदवार यांची यादी प्रसिद्ध करता येणार आहे तर 20 फेब्रुवारी 10 फेब्रुवारी दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.
11 फेब्रुवारी रोजी चिन्ह वाटप व उमेदवार यांची अंतिम यादी प्रसिद्ध करता येणार आहे तर 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते 4 या वेळेत विविध मतदान केंद्रावर मतदान करता येणार आहे तर 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे. मतदान केंद्राची यादी नंतर प्रसिद्ध करण्यात येणार आहे .
More Stories
महाराष्ट्र विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती धावणे के.डी.मॅडम यांना ‘लायन्स क्लब बार्शी रॉयल तर्फे राष्ट्र शिल्पकार आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान
बार्शीत रणगाडा? आमदार राजेंद्र राऊतांची कमाल..! बार्शीच्या इतिहासाला उजाळा.
हनुमान विद्यामंदिर, कव्हे ची यशाची परंपरा कायम