Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > छत्रपती शिवाजी महाराजांना दुग्धाभिषेक; राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

छत्रपती शिवाजी महाराजांना दुग्धाभिषेक; राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

मित्राला शेअर करा

कर्नाटकात काल छत्रपती शिवाजी महाराज याच्या पुतळ्याची जी विटंबना झाली आणि कर्नाटक चे मुख्यमंत्री यांनी केलेल्या बेताल वक्तव्य च्या निषेधार्थ तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष मा.ना.जयंत पाटील यांच्या आदेशानुसार सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज रविवार दिनांक 19 डिसेंबर रोजी सकाळी ठिक 11.30 छत्रपती शिवाजीमहाराज चौक येथे महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच सिंहासनरूढ मूर्तीला गुलाब पाकळ्याने व दुग्धाभिषेक करून श्रीफळ वाढवून कापुरार्ती करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवराय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो, कर्नाटक सरकारचा निषेध असो, कर्नाटक सरकारच्या मुख्यमंत्र्याचा निषेध असो, या कर्नाटक सरकारचे करायचे काय? खाली डोके वरती पाय, धिक्कार असो धिक्कार असो – कर्नाटक सरकार आणि मुख्यमंत्री यांचा निषेध असो अशी घोषणा देण्यात आल्या.

सबंध भारतातीलच नव्हे तर जगातील लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानले असून त्यांची बदनामी, विटंबना भाजप प्रणित कर्नाटक राज्यात होते आणि तिथले मुख्यमंत्री त्यावर बेताल वक्तव्य करतात ही बाब अत्यंत निषेधार्थ असून आम्ही त्याचा तीव्र निषेध करत असून सरकारने लवकरात लवकर पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना पकडून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी तसेच मुख्यमंत्र्यांनी केलेल्या बैताल या वक्तव्याबद्दल माफी मागावी असे शहर अध्यक्ष भारत जाधव या वेळी म्हणाले.

अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची कर्नाटक राज्यात झालेल्या विटंबनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आहोत, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे प्रेरणास्थान, ऊर्जा स्थान व अस्मिता आहेत. त्यांची बदनामी व विटंबना कदापि सहन करण्यात येणार नाही हे बसवराज बोम्मई कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याने लक्षात ठेवावे असा इशारा- शहर कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी दिला.

यावेळी शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोषभाऊ पवार, प्रदेश उपाध्यक्ष शफी इनामदार, महिला शहराध्यक्ष सुनिता रोटे, ज्येष्ठ नेते पद्माकर नाना काळे, राजन जाधव, लता ढेरे, निशांत साळवे, राजू कुरेशी, मिलिंद गोरे, वसीम बुराण, गफुर शेख, अमीर शेख, प्रकाश जाधव, तन्वीर गुलजार, बसवराज कोळी, शिवराज विभुते, ज्योतिबा गुंड, मनीषा माने, लता फुटाणे, अश्विनी भोसले, रेखाताई सपाटे, शांता शटगार, सुप्रिया लोमटे, मुसा अत्तार, अल्मेराझ आबादीराजे, आनंद मुस्तारे, अनिल बनसोडे, प्रमोद भोसले, युवराज माने, विशाल फुटाणे, पद्मसिंह शिंदे, सफल क्षीरसागर, सोमनाथ शिंदे, आशिष जेटीथोर, शोएब चौधरी, जयकुमार कांबळे, रियाझ मोमीन, जावेद कोतकुंडे, विजय भोईटे, बशीर चाचा शेख, गणेश छत्रबंद, अयुब पठाण, संजय जाबा, सिद्धेश्वर आंबट, शत्रुघ्न माने, आशिष बसवांती, प्रशांत फाळके, योगेश उबाळे आदी सह पक्षाचे शहरातील इतर सर्व मान्यवर पदाधिकारी तसेच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते.