कविवर्य कुसुमाग्रजनगरी येथे सुरू असलेल्या 94 व्या संमेलनात “ऐसी अक्षरे” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. चित्रकला आणि शिल्पकला हे देखील साहित्यच आहे त्यामुळे त्याचा देखील आम्ही सन्मान करतो.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अच्युत पालव यांचे कॅलिग्राफी प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भेट देऊन अच्युत पालव व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या.
आपल्या साहित्य संमेलनाचा परीघ ह्या वर्षी आपण वाढवला आहे. त्यात बालकवी कट्टा, प्रदर्शनाचा कार्यक्रम देखील घेतला आहे. साहित्य आणि चित्रकला ही आपल्याला नेहमी विचार करायला भाग पडतात आणि साहित्य, चित्रकलेतून मनात अनेक तरंग उठतात असे ते म्हणाले .
चित्रकला आणि शिल्पकला हे देखील साहित्यच आहे त्यामुळे त्याचा देखील आम्ही सन्मान करतो असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. कविवर्य कुसुमाग्रजनगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी आडगाव येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात “ऐसी अक्षरे” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अच्युत पालव यांचे कॅलिग्राफी प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले आपल्या साहित्य संमेलनाचा परीघ ह्या वर्षी आपण वाढवला आहे. त्यात बालकवी कट्टा, चित्रकला, कॅलिग्राफी, शिल्पकला प्रदर्शनाचा कार्यक्रम देखील घेतला आहे. साहित्य आणि चित्रकला ही आपल्याला नेहमी विचार करायला भाग पडतात आणि साहित्य, चित्रकलेतून मनात अनेक तरंग उठतात असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
यावेळी बोलताना श्री अच्युत पालव म्हणाले की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात चित्रकलेला आदरपूर्वक दिलेला सन्मान दिला याचा आनंद होत आहे अश्या भावना व्यक्त केल्या. यावेळी माजी खासदार तथा संमेलनाचे समन्वयक समीर भुजबळ, विश्वास ठाकूर, जयप्रकाश जातेगावकर, प्राचार्य प्रशांत पाटील यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
More Stories
बार्शीत हिरकणी ग्रुपच्या “श्रावण” सरी’त महिला चिंब..!श्री संस्कृती ग्रुप, सुलभा घुबे, अमृता खंदाडे प्रथम
सकाळ आयोजित सन्मान महाराष्ट्रातील महाब्रॅण्डचा या कार्यक्रमात भूमी डेव्हलपर्स चा सन्मान
बार्शीचे सुपुत्र मयूर गलांडे यांची एबीपी माझा च्या ‘डेप्युटी प्रोड्यूसर’ पदी नियुक्ती