सोलापूर : आषाढी वारीपूर्व नियोजनाबाबत बैठक नियोजन भवन येथे संपन्न झाली. मागील दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आषाढी वारी वारकरी संप्रदायाच्या परंपराचे जतन करून प्रतिनिधीक स्वरुपात साजरी केली होती.

आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर कोरोना निर्बंध हटविण्यात आले आहेत त्यामुळे यंदा आषाढी वारी मोठ्या प्रमाणात भरण्याची शक्यता आहे.
याचा विचार करून सर्व विभागाने समन्वय ठेवून आवश्यक नियोजन करण्याच्याा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या
आषाढी वारीपूर्व नियोजनाबाबत नियोजन भवन येथे बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, डीपीओ सर्जेराव दराडे, आरडीसी शमा पवार, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, सीएस डॉ. प्रदीप ढेले, डीवायएसपी विक्रम कदम, तहसीलदार सुशील बेल्हेकर उपस्थित होते.
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले