परांड्याचे सुपुत्र जागतिक कीर्तीचे संशोधक डाॅ. गजानन राशीनकर यांना ब्रँड कोल्हापूर पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रतिष्ठित मानल्या जाणारा”ब्रॅंड कोल्हापूर” हा पुरस्कार विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो .ब्रँड कोल्हापूर हा पुरस्कार मुख्यमंत्री कार्यालयाचे मानद प्रधान सचिव श्री.विकास खारगे सर. माननीय गृहराज्यमंत्री (राज्य) श्री. यांचे अनंत आभार. सतेज (बंटी) पाटील साहेब व विधानसभा सदस्य व युथ आयकॉन श्री. रुतुराज पाटील यांच्या उपस्थितीत प्रधान करण्यात आला.
डाॅ.राशीनकर हे शिवाजी विद्यापीठात कार्यरत आहेत व त्यांचे पदव्युत्तर शिक्षण याच विद्यापीठात घेतले आहे या रसायनशास्त्रज्ञांनी स्तनांच्या कर्करोगाबाबत सर्वसामान्य पेशींना अपाय न करता केवळ कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करणाऱ्या औषधाविषयी यशस्वी संशोधन केले असून, त्याचे भारतीय पेटंट या शास्त्रज्ञांना मिळाले आहे. रसायनशास्त्र अधिविभागातील संशोधक डॉ. गजानन राशिनकर आणि त्यांचे विद्यार्थी डॉ. प्रकाश बनसोडे यांनी ही कामगिरी केली आहे.
या प्रसंगी बोलताना श्री राशीनकर यांनी सांगितले की
मला अतिशय आनंद होत आहे की मला आणि डॉ. प्रकाश बनसोडे यांना आज प्रतिष्ठित ब्रँड कोल्हापूर पुरस्कार मिळाला आहे.
हा निव्वळ पुरस्कार नसून एक मोठी जबाबदारी आहे. मी या पुरस्कारास पात्र आहे हे सिद्ध करण्यासाठी मी संशोधनात प्रचंड मेहनत घेईन आणि कोल्हापूरची शान वाढवण्यासाठी नेहमीच प्रामाणिकपणे आणि समर्पणाने काम करीन.हा माझ्या आयुष्यातील मला मिळालेला सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे आणि तो माझ्यासाठी नेहमीच खास राहील. मी हा पुरस्कार माझ्या आई, भाऊ, माझे शिक्षक, माझे मित्र आणि माझ्या विद्यार्थ्यांना समर्पित करतो ज्यांनी मला वेळोवेळी बिनशर्त पाठिंबा दिला आणि प्रोत्साहन दिले. अशा भव्य, सुंदर, सुनियोजित आणि भव्य कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल आयोजन समितीच्या सदस्यांना सलाम. मी माझ्या आयुष्यात पाहिलेली ही सर्वात शिस्तबद्ध आणि अद्भुत घटना होती. आज अपार आनंद वाटत आहे.
More Stories
राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’
धाराशिव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ समिती प्रमुखांनी दिले प्रशिक्षण
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत