-: अभंग :-
निर्गुणाचें भेटी आलों सगुणासंगें । तंव झालो प्रसंगीं गुणातीत ॥ १ ॥
मज रूप नाहीं नांव सांगू काई । झाला बाई बोलूं नये ॥ २ ॥
बोलतां आपली जिव्हा पैं खादली । खेचरी लागली पाहतां पाहतां ॥ ३ ॥
म्हणे गोरा कुंभार नाम्या तुझी भेटी । सुखासुखी मिठी पडली कैसी ॥ ४ ॥
~~~~~~
[ तेर प्रतिनिधी :- हरी खोटे ]
प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेर ता उस्मानाबाद येथील वारकरी साप्रंदयाचे श्रध्दास्थान असलेल्या श्री संत गोरोबा काकांच्या पायी पालखी सोहळ्याचे प्रतिवर्षी प्रमाणे शनिवार दिनांक ६ नोव्हेंबर रोजी म्हणजेच भाऊबीजेच्या दिवशी मजल दर मजल करत टाळ मृदुंगाच्या तालावर हरिनामाचा जयघोष करत मोठ्या भक्तीमय वातावरणात आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते पालखी सोहळ्याचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले.
संत गोरोबा काका यांचा पालखी सोहळा म्हणजे तेर व परिसरातील आबालवृद्धांसाठी उत्साहाची पर्वणी असते
मंदिर समितीचे प्रशासक प्रदीप भोसले , भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे , रचना कन्ट्रक्शनचे दत्तात्रय मुळे , सरपंच नवनाथ , नाईकवाडी , उपसरपंच रवीराज चौगुले , हभप रघुनंदन महाराज पुजारी , ग्रा प सदस्य प्रभाकर शिंपले , मजिद मणियार , रुग्ण कल्याण समितीचे सदस्य बबलू मोमीन , मंदिराचे व्यवस्थापक साहेबराव सौदागर , धनंजय पुजारी , माजी सरपंच महादेव खटावकर , नानासाहेब भक्ते , संजय जाधव , शामराव गायके , हरी भक्ते , हभप गोविंद महाराज पांगरकर , अविनाश तपासे , अजित कदम , रणधीर सलगर , कीर्तनकार हभप नामदेव महाराज थोडसरे , चोपदार केशवराव मुळे , मृदंग वादक विजय फंड , चोपदार शिवाजी भोसले , हभप शिवाजी महाराज रोगे , मृदंग वादक पोपट थोडसरे , गायक लक्ष्मण पांचाळ आदिंसह हजारो भाविक भक्तांसह नागरिकांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये गोरोबा काकांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले
यावेळी गावातील महिलांनी ही गोरोबा काकांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी जागोजागी रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक रांगोळ्या काढत गोरोबा काकांच्या पालखीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने सर्वत्र भक्तीमय वातावरणात निर्माण झाले होते विशेष करून धनगर समाज बांधवांच्या वतीने शेकडो वर्षांची परंपरा जमत पारंपारिक वाद्यांच्या तालावर विविध प्रकारच्या नृत्याचे सादरीकरण केले दरम्यान टाळ मृदुंगाच्या तालावर हरीनामाचा गजर करीत गोरोबा काकांचा पालखी सोहळा हिंगळजवाडी मुक्कामासाठी मार्गस्थ झाला.
हिंगळजवाडी , उस्मानाबाद येथील मुक्कामानंतर गोरोबा काकांच्या पालखी सोहळ्याचे सोमवार दिनांक ८ रोजी सोलापूर जिल्ह्यांतील भांतब्रा येथे सायंकाळच्या सुमारास मुक्कामासाठी दाखल होणार आहे.
विशेष म्हणजे गतवर्षी कोरोना या महाभयंकर महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भाविकांना पंढरपूरला जाण्यासाठी बंदी घालण्यात आली होती परंतु यावर्षी राज्य सरकारने कार्तिक सोहळ्यासाठी परवानगी देण्यात आल्यामुळे गोरोबा काकांचा पायी पालखी सोहळा पंढरपूरला नेण्यात आला
या पालखीचे वैशिष्ट्य म्हणजे हा पालखी सोहळा मजल दर मजल करत हिंगळजवाडी , उस्मानाबाद भांतब्रा , वैराग , यावली , खैराव , अनगर , रोपळे येथे मुक्कामास थांबून रविवार दि.14 पहाटे चंद्रभागेच्या तीरावर पोहोचणार आहे दरम्यान ढोकी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश बनसोडे , अमंलदार प्रकाश तरटे यांच्यासह ढोकी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता यावेळी
पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना रणझुंजार तरूण मंडळाच्या वतीने टोपी व उपरणेचे वाटप करण्यात आले तर दत्ता प्रभु काळे यांच्या वतीने वारकऱ्यांना पाण्याच्या बाटल्याचे वाटप करण्यात आले.
More Stories
महाराष्ट्र विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती धावणे के.डी.मॅडम यांना ‘लायन्स क्लब बार्शी रॉयल तर्फे राष्ट्र शिल्पकार आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान
बार्शीत रणगाडा? आमदार राजेंद्र राऊतांची कमाल..! बार्शीच्या इतिहासाला उजाळा.
हनुमान विद्यामंदिर, कव्हे ची यशाची परंपरा कायम