Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > कृषी व पशुसंवर्धन > उसाचा दर जाहीर करा अन्यथा आंदोलन करमाळा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

उसाचा दर जाहीर करा अन्यथा आंदोलन करमाळा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

मित्राला शेअर करा

ऊसाचा दर जाहीर करा , अशी मागणी करत विज बिल वसुलीचा निर्णय रद्द करा अन्यथा आंदोलन केले जाईल , असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनी करमाळा तालुक्यातील तीन साखर कारखान्यांना दिला आहे .

स्वाभिमानी शेतकरी संघटनेनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की , शेतकन्यांचा ऊस उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे . रासायनिक खतांच्या किमती वाढल्या आहेत . इंधन दरवाढीमुळे मशागतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे . त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे . या ऊलट साखरेचे वाढलेले दर व उपपदार्थाला वाढलेली मागणी पहाता सध्या कारखान्यांना चांगले दिवस आले आहेत त्यातच ब्राझील सारख्या देशात कमी झालेले साखरेचे उत्पादन . त्यामुळे जागतीक बाजारात साखरेचे दर 40 च्या पुढे गेले आहेत . त्यामुळे कारखान्यांनी कायद्याप्रमाणे एक रकमी एफआरपी दिल्यास शेतकऱ्याचा उत्पादन खर्च निघणार आहे . तरच शेतकरी टिकेल व कारखाने बंद झाल्यानंतर अधिकचे 300 रु शेतकन्यांना द्यावेत . एक रकमी एफआरपीमुळे शेतकन्यांना त्यांचे कर्ज नवे जुने करता येईल .

म्हणून विचारपूर्वक जयसिंगपुर येथील ऊस परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एफआरपी अधिक 300 रुपयेचा ठराव झालेला आहे . ऊस दर देण्यामध्ये सोलापूर जिल्हा हा कोल्हापूरच्याच नव्हे तर मराठवाड्याच्याही मागे आहे . तरी कमलाई साखर कारखाना पांडे , भैरवनाथ साखर कारखाना विहाळ व मकाई सहकारी साखर कारखाना या तीनही साखर कारखान्यांनी एफआरपी अधिक 300 चा दर जाहीर करावा , अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनी केली आहे .

साखर आयुक्त व कारखानदार यांच्यात विजबिला संदर्भात आनलाईन बैठक झाली आहे . त्या बैठकीला सर्व कारखानदारांनी उपस्थित राहुन एक मुखाने ऊसबीलातून विज बिल कपात करण्याचा साखर आयुक्तांनी निर्णय घेतला . त्या निर्णयाचा साखर आयुक्त व कारखानदार यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनी तिव्र निषेध केला आहे . शेतकऱ्याच्या ऊसबिलातुन वीज बिल वसूल करण्याचा कोणताही कायदा नसताना अशी सक्तिची विज बिल बेकायदेशीर वसुली संबंधित शेतकन्यांच्या संमतीशिवाय करू नये , असे केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकरी यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल , असा इशारा देण्यात आला आहे . स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवी गोडगे , करमाळा तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके , तालुका युवाअध्यक्ष अमोल घुमरे , बापू फरतडे , जातेगाव शाखाध्यक्ष अशोक लवंगारे उपस्थित होते.