भाऊबीज निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आदर्श शाळा प्रकल्प याविषयी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
सविस्तर वृत्त
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री गटकळ सर यांनी माझी शाळा स्वच्छ, सुंदर व गुणवत्ता पूर्ण शाळा आदर्श शाळा प्रकल्प या विषयाचे चर्चासत्राचे आयोजन केले होते. यावेळी गावातील सर्व पक्षाचे नेतेमंडळी तरुण युवक मंडळी वृक्ष संवर्धन समितीचे सर्व कार्यकर्ते तसेच श्री देवराम सर श्री गलांडे सर श्री नलवडे सर श्री करळे सर आपल्या गावच्या कन्या रेश्मा (ताई) कारभारी आवर्जून उपस्थित होत्या
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री मनोज (नाना) पाटील यांनी केले. त्यानंतर श्री गटकळ सर यांनी शाळे विषयी सविस्तर माहिती सांगून शाळेतील उपलब्ध असणाऱ्या सुख सुविधा आणि पुढे शाळेसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती सांगून शाळा सुसज्ज आणि सुशोभीकरण करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर भर देऊन विद्यार्थी
परिपूर्ण घडवण्याचा मानस व्यक्त केला त्यासाठी गावातील सर्व नागरिकांनी तसेच पालकांनी शाळेसाठी स्व इच्छेने शक्य होईल तेवढे सहकार्य करण्याचे आवाहन केले.
त्यानंतर सौ रेश्मा ताई यांनी भाऊबीज निमित्त वाकडी तील वृक्ष संवर्धन समितीच्या सर्व सक्रिय कार्यकर्ता ना दिवाळी भेट म्हणून त्यांनी बनवलेल्या बॅगांचे वाटप केले. यावेळी बोलताना ताईंनी गावातील युवकांना गट तट विसरून एकजुटीने सामाजिक काम चालू ठेवण्याचे आवाहन केले. त्यानंतर भारत रगडे यांनी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबविण्याची विनंती केली.त्यानंतर शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष विवेक पाटील यांनी गावकऱ्यांच्या वतीने शाळेसाठी पालकांकडून तसेच शासनाकडून विविध योजना राबवून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
त्यानंतर जयवंत पाटील यांनी गावातील यात्रा,सप्ताह यातील देणगीची दहा टक्के रक्कम आदर्श शाळा प्रकल्पासाठी द्यावी अशी विनंती यात्रा कमिटी च्या कार्यकर्त्यांना केली. तसेच आपल्या गावचे आदर्श शिक्षक राजेभाऊ सोनमाळी यांनी प्राणायाम आणि योगा याचे विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी फायदे सांगून प्राणायाम आणि योगा शाळेच्या परिपाठात समाविष्ट करून घेण्याची विनंती केली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक नलवडे सर यांनी केले यावेळी त्यांनी जिल्हा परिषद शाळेच्या आदर्श शाळा प्रकल्पासाठी सर्व शिक्षकांचे प्रत्येकी पाच हजार रुपये जाहीर करून नागरिकांनाही मदत जाहीर करण्याचे आव्हान केले.
यानंतर गावचे आदर्श शिक्षक श्री राजाभाऊ सोनमाळी सर यांनी ५०००
रामराजे नलवडे ५०००
मनोज नाना पाटील ५०००
विवेक दादा पाटील १००००
बंडू रगडे १००००
महादेव सोनमाळी १००००
दत्ता माळी १००००
विक्रम भालेकर५०००
जयंत पाटील ५०००
गणेश पाटील ५०००
विशाल पाटील २०००
सतीश रगडे ५०००
यशवंत पाटील २०००
यांनी आदर्श शाळा प्रकल्पासाठी देणगी जाहीर केली त्याबद्दल सर्वांचे आभार मानले
More Stories
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत
तेर येथील नृसिंह नवरात्र महोत्सवाच्या रक्तदान शिबिरात 67 भक्तांचे रक्तदान
महाराष्ट्र विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती धावणे के.डी.मॅडम यांना ‘लायन्स क्लब बार्शी रॉयल तर्फे राष्ट्र शिल्पकार आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान