कोणतीही घटना घडत असताना मनावरचा अंकुश सुटला की बरेच काही अघटित घडते नि नंतर पश्चातापा शिवाय काही उरत नाही..म्हणूनच संयम ठेवणे खूप गरजेचे आहे…नक्कीच सोपे नाही, पण अशक्य असेही काही नाही.
संयमाची कास उन्नतीचा ध्यास असत
कोणत्याही परिस्थितीत मनाच्या चलबिचलला, होणाऱ्या उलाघालीला शांत राहून संयमाने परिस्थितीला सामोरे जाणे तितकेसे सोपे नसतेच मुळी!..पण, हाच गुण अंगी बाणण्याचा प्रयत्न यशस्वी झाला की उन्नती ही झाल्याशिवाय राहत नाही हे अगदी कटू सत्य आहे.पण मनुष्य जास्त वेळ संयम ठेवू शकत नाही,जास्त वेळ प्रतिक्षा करू शकत नाही. त्याच्या परीणाम हा वाईट च होत असतो. म्हणूनच जीवनात संयम, प्रतिक्षा खूप महत्वाची आहे.
एकदा एक मनुष्य रस्त्याने जात होतो.त्या रस्त्यावर मोठा खड्डा होता त्याच्यात तो पडला .तो खड्ड्यातून मोठ मोठ्याने आरोळी मारू लागला पण त्याच्या मदती साठी कोणीच आले नाही.त्याने विचारात बदल केला तो फुल वर फेकू लागला, जेणे करून त्याला वाचवायला कोणीतरी येईल. तरीपण त्याच्या मदतीसाठी कोणीच आले नाही. आता त्याच्या संयमाचे बांध हळू हळू ढासळायला लागला .शेवटी त्याच्या संयम सूटला आणी आता तो त्या खड्ड्यातून दगड वर फेकू लागला. जेणेकरून रस्त्यावरून जाणारा व्यक्ती त्याच्या मदती साठी येईल. त्याने मारलेला दगड रस्त्याने जाणा-या माणसाले लागला. तो माणूस त्या खड्ड्यातजवळ गेला त्याने खड्ड्यात एक माणूस पाहिला पण ह्या माणसाने दगड मारलेला होता म्हणून तो त्याला मदत न करताच निघून गेला. तो खड्ड्यात पडलेला माणूस तिथेच वाट पहात राहिला.त्याने थोडा संयम ठेवला असता आणी फुले वर फेकली असती तर एखादा माणूस निश्चित त्याला वाचवायला आला असता.संयमी मन शांतीचे प्रतीक असते.
माना की अंधेरा घना है,
लेकिन दिया जलाना कहा मना है।
जिंदगी मे समाधान ओर शांती चाहते हो,
तो प्रतिक्षा और संयम जीवन मे लाना है।
शब्दांकन श्री.यशवंत निकवाडे
More Stories
राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’
धाराशिव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ समिती प्रमुखांनी दिले प्रशिक्षण
बार्शी येथे चर्मकार समाज वधूवर सुचक मेळावा संपन्न