पुणे-हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांच्या जाज्ज्वल्य इतिहासाचं स्मरण म्हणून पुण्यनगरीचं पश्चिम प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या चांदणी चौकात महापौर निधी’तून ‘ हिंदवी स्वराज्य निर्मिती शिल्प ‘ लवकरच साकारले जात आहे.
राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि सोन्याच्या नांगराने पुण्यनगरी नांगरणारे छत्रपती शिवराय, असं या शिल्पाचे स्वरुप आहे. या भव्य दिव्य शिल्पाने पुण्याच्या वैभवात तर भर पडणारच आहे, शिवाय इतिहासाचं हे सोनेरी पान आपणा सर्वांनाच लढण्याची प्रेरणा देत राहील. अशा आशयाची पोस्ट पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शेअर केली आहे.
More Stories
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ