श्री भगवंत योग परिवाराचे योग गुरु अनिल वेदपाठक यांना 26 जानेवारी रोजी दिल्ली येथे होणाऱ्या परेड साठी विशेष अतिथी म्हणून आयुष आरोग्यवर्धिनी केंद्र गाडेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील योग प्रशिक्षक अनिल वेद पाठक यांना सपत्नीक शासकीय खर्चाने निमंत्रित केले आहे.
योग परिवार बार्शी साठी कौतुकाची बाब ठरली असून यांचे सर्व तालुका स्तरातून अभिनंदन तर होतच आहे, बार्शी तालुका व सोलापूर जिल्ह्यासाठी, ही अभिमानाची गोष्ट असून, आयुष आरोग्यवर्धिनी केंद्र गाडेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या संस्थेचे सुद्धा नाव दिल्लीपर्यंत पोहोचले आहे. अशी चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे
बार्शीच्या शिरेपेचात एक सोनेरी पदक योग गुरु अनिलजी वेदपाठक यांच्या रूपाने प्राप्त झालेले आहे असेही बोलले जात आहे. सदर सर्व भारतातील निमंत्रित योग अतिथी योग गुरू अतिथी यांना मा. प्रधानमंत्री मोदीजी यांच्या समवेत चहापानाचा बहुमान मिळणार आहे.
अनिलजी वेदपाठक हे मागील दोन महिन्यापासून नित्यनेमाने दररोज आयुष आरोग्यवर्धिनी केंद्र गाडेगाव या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना विविध आजारावरती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुधीर घोडके यांच्याशी चर्चा करून योगा अभ्यासाचे सल्ले व प्रात्यक्षिक रुग्णांकडून करून घेतात व रुग्णांना योगचिकित्सा घेण्यासाठी प्रवृत्त करतात या चिकित्सेचा सर्व रुग्णांनी खूप चांगल्या प्रकारे लाभ घेतलेला आहे व त्यांच्या या सहकार्याचा लाभ इतरही सर्व रुग्णांनी घ्यावा असे आवाहन वैद्यकीय अधिकारी सुधीर घोडके यांनी केले आहे
More Stories
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!
बार्शी येथे मनशक्ती प्रयोग केंद्राची आरोग्यप्राप्ती, रोगमुक्ती कार्यशाळा संपन्न