Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > रायगडावर हेलिपॅड वादावर संभाजीराजे छत्रपतींनी दिली माहिती

रायगडावर हेलिपॅड वादावर संभाजीराजे छत्रपतींनी दिली माहिती

मित्राला शेअर करा

राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांना स्वतः संभाजीराजे छत्रपती यांनी दुर्गराज रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते . यास प्रतिसाद देत राष्ट्रपती छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देत आहेत , हि आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे अशी माहिती छत्रपतींनी दिली होती .

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही त्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्याची इच्छा व्यक्त करत हे दि 6 डिसेंबर रोजी रायगडावर येणार आहेत .मात्र रायगडावरील होळीच्या माळावर बनवण्यात येणाऱ्या हेलिपॅडला काही शिवप्रेमीं विरोध दर्शवत होते.

विरोध दर्शवणार्‍या आशयाच्या पोस्ट Instagram, Facebook वरती पहायला मिळत होत्या.शिवप्रेमींच्या विरोधानंतर राष्ट्रपती कोविंद कसे येणार याबाबत प्रश्न उपस्थित राहत होते. या वादावर आता पडदा पडला असे म्हणता येईल कारण या प्रश्नावर
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करीत महत्वाची माहिती दिली आहे . “ राष्ट्रपती रोपवेने रायगडावर येणार आहेत , ” असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हंटले आहे . संभाजीराजे छत्रपतींनी आपल्या ट्विटर पोस्ट मधे म्हटले आहे .

राष्ट्रपती कोविंद स्वतः शिवभक्त असून २०१८ साली अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीने राजधानी दिल्ली येथे आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . याच सोहळ्यात युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी माननीय राष्ट्रपती महोदयांना छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र भेट म्हणून दिले होते .

त्यापूर्वी राष्ट्रपती भवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा नसल्याने सदरचे तैलचित्र राष्ट्रपती भवनामध्ये त्यांनी अत्यंत अभिमानाने लावलेले आहे .

त्यानंतर युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेऊन त्यांना किल्ले रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते . युवराज संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली रायगड विकास प्राधिकरणाच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून गडावर संवर्धनाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे , याचीही माहिती संभाजीराजे यांनी यावेळी राष्ट्रपती कोविंद यांना दिली होती . संभाजीराजे यांच्या निमंत्रणास प्रतिसाद देऊनच शास्त्रोक्त पद्धतीने सुरू असलेल्या या गडसंवर्धनाच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रपती कोविंद रायगडास येत आहेत , हि सर्व शिवभक्तांसाठी आनंददायी बाब आहे.