बार्शी तहसील कार्यालय यांचेकडून संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थी तपासणी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या मोहिमेंतर्गत 21000 /- रुपये वार्षिक उत्पन्न दाखला व बँकेत हयातीचा दाखला देण्यास बंधनकारक करण्यात आले आहे.

त्यामुळे लाभार्थ्यांची धावपळ सुरू झाली व याचाच फायदा तहसील कार्यालय परिसरात वावरणारे दलाल यांनी प्रत्येक दाखल्यासाठी 2000 /- पेक्षा जास्त रकमेची मागणी होत असल्याने हे शोषण तात्काळ थांबवण्याची मागणी वंचित बहुजन महिला आघाडीच्या शहराध्यक्ष रेखा सरवदे यांनी लेखी पत्राद्वारे मा. जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे केली आहे.
सदरचे निवेदन नायब तहसीलदार श्री काजी साहेब यांनी स्वीकारले यावेळी सारिका जाधवर, सुनंदा चव्हाण, वैशाली ढगे, संगीता पवार उपस्थीत होत्या
More Stories
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक