श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयामध्ये दि.2/11/2023 रोजी कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी ने आवाहन केल्याप्रमाणे प्रत्येक शाखेत संकल्प दिन साजरा करण्यात यावा असे ठरले. या संकल्प दिन उपक्रमा अंतर्गत पर्यावरण जाणीव जागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून वृक्ष संवर्धन समितीचे संस्थापक मा. श्री काळे यू . डी. हे होते. तसेच मा. प्रा. मधुकर डोईफोडे, मा. पोलिस अधिकारी श्री अमृत खेडकर, मा. श्री. सुनील फल्ले व राणादादा देशमुख, मा.श्री उदय पोतदार हे उपस्थित होते.
सर्व प्रथम अमृत खेडकर यांनी मार्गदर्शन केले व वृक्ष संवर्धन समितीचे कार्य स्पष्ट केले. श्री राणादादा देशमुख यांनी देखील मार्गदर्शन केले. मा. श्री उमेश काळे यांनी वृक्ष संवर्धन समितीचे कार्य सविस्तरपणे सांगितले व मामांच्या सेवेची संधी मिळणे हे वृक्षसंवर्धन समितीसाठी भाग्याची गोष्ट आहे असेही ते म्हणाले. ग्रामीण भाग तसेच शहरी भागात वृक्ष लावून त्याचे संवर्धन करण्याचे कार्य केले व त्यातून बार्शी शहरात वृक्ष लावणे व जतन करण्याची संस्कृती वाढवली असे यावेळी बोलताना ते म्हणाले.
यानंतर मा. श्री मधुकर डोईफोडे सर यांनी वृक्ष संवर्धन समितीने केलेले कार्य सांगितले. राष्ट्रीय पातळीवर देखील त्याची दखल घेण्यात आली हे सांगितले.
सर्वात शेवटी प्राचार्य डॉ. दीपक गुंड सर यांनी वृक्ष संवर्धन समितीच्या कार्याचे कौतुक केले व आम्ही देखील या कार्यात सहभाग घेवू असे सांगितले. कार्यक्रमाचे सू्त्रसंचालन प्रा. साबळे सर यांनी केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते अध्यापक विद्यालयाच्या परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी अध्यापक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
More Stories
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय, दुचाकी मालिका सुरू- आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन