पानगाव :- पानगाव (बार्शी) येथील संत तुकाराम विद्यालयात आज माजी सैनिक, शहिद जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान सोहळा पार पडला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशासाठी प्राणपणाने लढणाऱ्या व प्रसंगी प्राणाची बाजी लावणाऱ्या सेवानिवृत्त सैनिकांचा व कुटुंबियांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
याप्रसंगी मेजर अमित कापसे, मेजर जगन्नाथ कापसे, वीरपिता भगवान आबा मोरे, वीरपूत्र रविंद्र दिगंबर चव्हाण, मेजर दामोदर पवार, मेजर गोपीनाथ कानगुडे, मेजर राजेश चव्हाण, मेजर निलेश काळे, मेजर सचिन कापसे, मेजर बापूसाहेब कानगुडे श्रीमती सुशीला भुतेकर, इंद्रजीत भुतेकर यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री.आप्पासाहेब कानगुडे, श्री.दत्तूनाना काळे श्री.अजित पाटील, श्री पिंटू नाईकवाडी, श्री. संतोष कानगुडे श्रीमती विजयाताई मोरे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. सर्व सत्कारमूर्तीच्या वतीने मेजर दामोदर पवार व मेजर अमित कापसे यांनी मनोगत व्यक्त केले. शाळा व समाजासाठी माजी सैनिक संघटना सदैव कार्यतत्पर राहील अशी ग्वाही देऊन शालेय विद्यार्थ्यांकडून देशसेवा करण्याची व सैन्यभरती साठी प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त केली. श्री दत्तूनाना काळे,श्री संतोष कानगुडे श्रीमती विजयाताई मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.शाळा राबवत असलेल्या अनेक उपक्रमाबाबत कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री.पी.पी.पाटील यांनी केले. सूत्रसंचालन श्री.प्रमोद जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री दोडय्या स्वामी यांनी केले. कार्यक्रमानंतर विद्यार्थांना अल्पोपाहाराचे वाटत करण्यात आले.
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा जेष्ठ संपादक राजा माने यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर