याआधी ई-पीक पाहणीमध्ये नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती
मात्र अनेक शेतकऱ्यांनी यामध्ये नोंदणी केली नाही – त्यामुळे नाफेडमध्ये हरभरा पिकाची नोंदणी करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना अडचण येत आहे
ती म्हणजे ऑनलाईन पीकपेरा नोंदणीची – तसेच हा पीकपेरा ई-पीक पाहणीच्या माध्यमातून नोंदणी केली तरच निघणार आहे
त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना 15 मार्चपर्यंत ई-पीक पाहणीमध्ये नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे
ई-पीक पाहणीचा काय फायदा ?
ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड करा
https://play.google.com/store/apps/details?id=org.mahait.epeek
ई-पीक पाहणी या अँपमुळे शेतकऱ्यांना त्यांनी घेतलेल्या पिकाची नोंद ऑनलाईन करता येणार आहे त्यामुळे याची नोंद थेट पिकपेऱ्यावर होणार आहे
त्यामुळे ई-पीक पाहणीची अंमलबजावणी केली तर हरभऱ्यासाठी देण्यात आलेल्या हमीभावाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे
15 मार्चपर्यंत ई-पीक पाहणीमध्ये नोंदणी संदर्भातील हि माहिती शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची आहे इतर शेतकरी मित्रांना देखील शेअर करा
More Stories
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन
कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालय, बार्शी येथे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न
राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’