आजपासून एमसीएचे निमंत्रण साखळी सामने
सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेम्बर्सु यांच्याकडून त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. त्यावेळी सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेच्या निवड समितीचे चेअरमन उदय डोके, सुनील मालाप, संजय मोरे, किरण पवार, उमेश मामड्याल, गोटे, के.टी.पवार आदी उपस्थित होते.
आनंद शेलार हे स्वतःदेखील यापूर्वी सोलापूर जिल्हा वरिष्ठ संघाकडून हे सामने खेळले आहेत. तसेच ते २०२१ च्या वर्ल्ड सेफ्टी सिरीजमध्ये वेस्ट इंडिज संघाचे प्रशिक्षक राहिले आहेत. महाराष्ट्रातील नामवंत प्रशिक्षकांमध्ये त्यांची गणना केली जाते. त्यामुळे या साखळी सामन्यांमध्ये सोलापूर जिल्ह्याचा संघ सर्वोत्कृष्ट कामगिरी करेल, अशी आशा आहे.
महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशन आयोजित निमंत्रण साखळी सामने कोल्हापूर येथे ७ मार्च पासून सुरू होत आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्यांमधून महाराष्ट्राच्या रणजी संघाचे खेळाडू निवडले जातात. त्यामुळे या सामन्यांना महत्व प्राप्त झाले आहे.
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा जेष्ठ संपादक राजा माने यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर