रशिया-युक्रेन युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत आहे. हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याने त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी सर्वप्रकारे प्रयत्न सुरू आहेत.
युक्रेनमध्ये अडकून पडलेले सर्व विद्यार्थी मेडिकलचं शिक्षण घेण्यासाठी तिथे गेले होते. देशात चांगले मार्क्स असूनही मेडिकलला ॲडमिशन मिळत नाही. प्रायव्हेट कॉलेजपेक्षा युक्रेनमधील मेडिकल शिक्षणाचा खर्च कमी आहे त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी युक्रेनला जात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. या चर्चांनंतर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी मेडिकल विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.
आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत भारतातील मेडिकल कॉलेजच्या कमतरतेबद्दल चिंता व्यक्त केली. तर महिंद्रा विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये मेडिकल कॉलेज सुरू करण्याच्या विचारात असल्याचंही आनंद महिंद्रा यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे. आनंद महिंद्रा यांनी टेक महिंद्राचे सीईओ सीपी गुरनानी यांना टॅग करत महिंद्रा विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये मेडिकल शिक्षण संस्था स्थापन करू शकतो का?, असा प्रश्न विचारला आहे.
दरम्यान, आनंद महिंद्रांच्या या ट्विटमुळे येत्या काळात महिंद्रा विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये मेडिकल कॉलेज दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर हे कॉलेज सुरू झालं तर विद्यार्थ्यांना परदेशात जावं लागणार नाही अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत.
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा जेष्ठ संपादक राजा माने यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर