श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगरच्या तीन लाख मे. टनच्या पुढील पहिल्या ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीचे पूजन सोमवार दि . 21 रोजी, सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन मा. श्री. जयसिंह मोहिते- पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी यांच्या हस्ते मुकादम व ऊस वाहक संजय शेंडे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार रामभाऊ सातपुते, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन. ऍड. मिलिंद कुलकर्णी, संचालक बाबाराजे देशमुख, पंचायत समितीचे माजी उपसभापती मा. श्री. अर्जुनसिंह मोहिते पाटील, दत्तात्रय रणवरे, दत्तात्रय वाघमोडे, रामदास कर्णे, धोंडीराम नाळे, सुरेश पाटील, सुरेश मोहिते, नंदन दाते, शिवाजी गोरे , सुनील माने , चंद्रकांत शिंदे, रमेश जगताप, सुरेश मोहिते, शिवाजी लवटे, दादा वाघमोडे, विलास फडतरे, RPI चे जिल्हा सरचिटणीस सोमनाथ भोसले, तुकाराम चव्हाण लालखान पठाण, अभिमान सावंत, बिनू पाटील, अमर गोरे, एकनाथ वाघमोडे आदी मान्यवर तसेच शंकर सहकारी चे सभासद, शेतकरी, सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
More Stories
कृषी पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार
नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान; आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
विधानसभा तालिका सभाध्यक्षांची नियुक्ती जाहीर