Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > समाजसेवेची आवड असलेले अजय तिवारी यांनी वाढदिवस विवीध उपक्रमातुन साजरा केला

समाजसेवेची आवड असलेले अजय तिवारी यांनी वाढदिवस विवीध उपक्रमातुन साजरा केला

समाजसेवेची आवड असलेले अजय तिवारी यांनी वाढदिवस विवीध उपक्रमातुन साजरा केला
मित्राला शेअर करा

बार्शी :- समाज सेवेची आवड असलेले, ओन्ली समाज सेवा बहूउद्देशीय संस्था बाशीचे बार्शी तालूका अध्यक्ष अजय तिवारी यांनी आपला वाढदिवस हा विविध उपक्रमातुन साजरा केला.

ओन्ली समाज सेवा बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने वाढदिवस करताना अजय तिवारी यांनी येडाई विहिर या भागातील अंगणवाडी येथील मुला मुलींना गणवेश मोफत देण्याचे आश्वासन दिले आणी त्यासाठी प्रयत्न सुरु केले. तसेच मुलगा मुलगी एक समान आहे मुलीच्या स्वागत केले पाहिजे हाच विचार घेवुन दरवर्षी अजय तिवारी वाढदिवसादिवशी बार्शी रुग्णालय येथे वाढदिवसाविषयी मुलीच्या जन्मानिमीत्त ज्या मुली जन्माला आल्या आहेत त्या मुलींसाठी दरवर्षी पैजंण, एक ड्रेस, मच्छरदानी, एक खेळणी, गुलाब पुष्प देवून मुलीच्या जन्माचे आपल्या मिञांना घेवुन स्वागत साजरा करतात यावर्षी पाउस असतांना देखील त्यांनी हा उपक्रम घेतला. तसेच निसर्ग सेवेत देखील हे मागे नाहीत अजय तिवारी यांनी वृक्ष संवर्धन समितीच्या माध्यमातुन झाड लावुन वाढदिवस केला आहे.

वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमासाठी अ‍ॅड नितीन सोडळ, अमृत शाळु, ऋषी करडे, दिनानाथ काटकर सर, अ‍ॅड सुहास कांबळे, शिवलिंग चांदणे, पञकार गणेश गोडसे, कुणाल घोलप, राहुल वाणी, नागनाथ सोनवणे, गणेश कदम सर, कुमार परदेशी, सुमित नवले, महेश शिंदे, संतोष कळंमकर, दयानंद पिंगळे, बालाजी डोईफोडे, रामराजे बारंगुळे तसेच विवीध संस्थानी वाढदिवस साजरा केला. ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था, जाणिव फाउंडेशन, वृक्ष संवर्धन समिती सदस्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.