Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > सोलापूर जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी ओळखपत्र, प्रमाणपत्रासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन

सोलापूर जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी ओळखपत्र, प्रमाणपत्रासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन

सोलापूर जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी ओळखपत्र, प्रमाणपत्रासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन
मित्राला शेअर करा

तृतीयपंथीयांच्या प्रमाणपत्रासाठी सर्व शासकीय वसतीगृहात 23 सप्टेंबरला शिबीर

सोलापूर, तृतीयपंथीय व्यक्तींना तृतीयपंथीय असल्याबाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र उपलब्ध करून देण्याचे शासनाने निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील तृतीयपंथी यांना ओळखपत्र व प्रमाणपत्र मिळण्यासाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय व अधिनस्त असलेल्या तालुका स्तरावरील सर्व शासकीय वसतीगृहामध्ये 23 सप्टेंबर 2022 रोजी एकदिवशीय शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शिबीरासाठी जास्तीत जास्त तृतीयपंथीयांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीचे सदस्य सचिव तथा समाज कल्याणचे सहायक आयुक्त कैलास आढे यांनी केले आहे.

सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांच्याकडून तृतीयपंथीय व्यक्तीसाठी नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन्स http://transgender.dosje.gov.in

राष्ट्रीय पोर्टल सुरु केले आहे. तृतीयपंथीय यांच्या हक्कांचे संरक्षण अधिनियम २०१९ मधील नियम २०२० अंतर्गत, विभाग ६ व ७ नुसार जिल्हास्तरीय समितीद्वारे तृतीयपंथीयांना त्यांचे प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्याविषयीची तजविज आहे.

अधिक माहिती आणि संपर्कासाठी प्रत्येक शिबीरासाठी समन्वयकांची नेमणूक करण्यात आली आहे.

सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सोलापूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सातरस्ता, सोलापूर उमेश पुजारी (तालुका समन्वयक (9518907075), राजश्री कांबळे (समतादूत 9172753801), अश्विनी सुपाते (समतादूत 7066699352), मुलांचे शासकीय वसतिगृह, गाडेगाव रोड, बार्शी, गणेश पवार (तालुका समन्वयक 9763841038) यशपाल चंदनशिवे (समतादूत 8888004598), मुलांचे शासकीय वसतिगृह माढा, अनुराधा पंडित (समतादूत 9881526793), मुलांचे शासकीय वसतिगृह करमाळा, मुकंद लोंढे (समतादूत 9022509211), मुलांचे शासकीय वसतिगृह, पंढरपूर, ज्योती ओव्हाळ (समतादूत 7057437929), मुलांचे शासकीय वसतिगृह अकलुज, किरण वाघमारे (समतादूत 9730087016), मुलांचे शासकीय वसतिगृह अक्कलकोट, चिदानंद हिरेमठ (तालुका समन्वयक) श्रीम. नालंदा शिंदे (समतादूत 9623390015).