मैत्रीचा संदेश जपण्यासाठीच दलित मित्र पुरस्कार
बार्शी, : जगाला शांतीचा आणि मैत्रीचा पहिला संदेश तथागत गौतम बुद्धांनी दिला. त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन जिवापाड मैत्रीचे जपत अनेक गड, किल्ले सर केले. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अनेक मावळे स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वराज्य निर्माण करत होते. हाच धागा पकडत दलित महासंघाच्या वतीनेही मैत्रीत्व जपण्यासाठी हा दलित मित्र गौरव पुरस्कार दिला जातो, असे प्रतिपादन दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी केले. दलित महासंघाच्या वतीने, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय दलित मित्र गौरव पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी विचारपीठावर आमदार राजेंद्र राऊत, मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, सौ. पुष्पलता सकटे, शिवशक्ती अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश बुरगुटे, ज्येष्ठ पत्रकार राजा माने, माजी उपनगराध्यक्ष नवनाथ चांदणे, ॲड. अनिल पाटील, माजी बांधकाम सभापती ज्योतिर्लिंग कसबे, दिलीप गांधी, पत्रकार उमेश पवार, उद्योजक शशांक गुगळे, सचिन वायकुळे, अजित कांबळे उपस्थित होते.
आमदार राजेंद्र राऊत म्हणाले, बार्शीत काम करत असताना माझ्यासोबत सर्वच जाती जमातीचे लोक असतात. त्यामुळे मी समोरील कार्यकर्ता कोणाचा किंवा कुठला आहे याचा कधीच विचार करत नाही, असे प्रतिपादन करत बार्शीच्या सर्वांगीण विकासासाठी आपण नेहमीच कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
दलित महासंघाकडून २००८ सालापासून ७५ मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. बार्शी ही शाहिर अमर शेख यांची जन्मभूमि आहे. म्हणुनच दलित महासंघाकडून हा पुरस्काराचे दिला जातो.
रविवारी यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन येथे मच्छिंद्र सकटे, आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. जिल्हाध्यक्ष सुनिल अवघडे यांनी प्रास्ताविक केले.
श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार जयकुमार शितोळे (जीवनगौरव), वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे, कर्करोगतज्ञ डॉ.राहुल मांजरे (सेवा पुरस्कार), शिवशक्ती अर्बंन बँकेचे सहव्यवस्थापक गणेश बारंगुळे, जिल्हा परिषद सदस्य मदन दराडे, नगरसेविका वर्षा रसाळ, विधीज्ञ अॅड. प्रशांत शेटे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता आय्युब शेख, अडत व्यापारी सचिन मडके, साई डेव्हलपर्सचे उद्योजक सतिश अंधारे (दलित मित्र गौरव), माजी नगरसेवक अमोल चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते शंकर वाघमारे (युवा गौरव), पत्रकार मल्लिकार्जुन धारूरकर, धीरज शेळके (पत्रकारिता गौरव) यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. वानेवाडीच्या ग्रामपंचायत सदस्या प्रजाली यादव, दहावीत 92 टक्के गुण मिळवणारा हर्षल कसबे,अँड. विवेक गजशिव यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन नीता देव यांनी केले तर आभार संदीप आलाट यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शहराध्यक्ष संदिप अलाट, तालुकाध्यक्ष संगीतराव शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष निलेश खुडे, उमेश ढावारे, संतोष बगाडे, सचिन शिरसागर, अमृत आलाट, विनोद पवार, संतोष कांबळे, राम नवले, एडवोकेट अमोल आलाट, सत्यजित खलसे, विजय पवार यांनी परिश्रम घेतले.
बार्शीतील प्रसिद्ध व्यापारी कुमार कोठारी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मित निधन झाले. अशी माहिती आमदार राऊत यांनी आपल्या भाषणा दरम्यान दिली. त्यांचे भाषण संपताच सभागृहात कुमार कोठारी यांना दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.
More Stories
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
दीपस्तंभ नाटकामुळे नावलौकिक मिळाला आणि मी घडलो- डॉ गिरीश ओक