Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > १०५ किलो गांजा विक्री प्रकरणी आरोपीची जामीनावरती मुक्तता

१०५ किलो गांजा विक्री प्रकरणी आरोपीची जामीनावरती मुक्तता

१०५ किलो गांजा विक्री प्रकरणी आरोपीची जामीनावरती मुक्तता
मित्राला शेअर करा

कादीर असिफ पठाण, प्रकाश संतोष बारटक्के रा. तेलंगवाडी ता. मोहोळ यांना त्यांचेकडील असलेल्या ब्रिझा व ट्रिबर कार मध्ये एकुण ५२ पॅकेटमध्ये १०५ किलो वजनाचा एकुण किंमत ३६,०७,६००/- किंमतीचा गांजा विक्री करण्यासाठी ओरिसा राज्य येथुन घेवुन अकलुज येथे येत असल्याबाबत खबर मिळताच एल. सी. बी. सोलापुर यांनी आरोपींना मोडनिंब येथे सापळा रचुन अटक केली होती.

त्यावेळी आरोपी संतोष तुकाराम कदम हा पळुन गेला अशी फिर्याद पोलिसांनी ता. ५/१/२०२४ रोजी दिली असता आरोपी संतोष कदम यास पोलिसांनी ता. १/२/२०२४ रोजी अटक केली. त्याचा जामीन अर्ज मे. सत्र न्यायालय, बार्शी येथे ॲड. शामकुमार झालटे यांनी दाखल केला.

त्यावर आरोपीचे वकिल ॲड. शामकुमार झालटे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपीची रक्कम रु. २५,०००/- वरती मा. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. एल.एस. चव्हाण यांनी ता. ४/९/२०२४ रोजी जामीनावरती मुक्तता केली. यात आरोपीतर्फे ॲड. शामकुमार झालटे व ॲड. शिवराज भोसले यांनी काम पाहिले.