केंद्र सरकारने 2019 साली राष्ट्रीय पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून फक्त नोकरदारांनाच लाभ घेता येत होता पण आता या योजनेत सुधारणा करण्यात आली असून शेतकऱ्यांसह छोट्या दुकानदारांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे व या योजनेत मासिक 3000 रुपये पेन्शन मिळू शकते.

कोणाला मिळेल पेन्शन ?
राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत किरकोळ व्यापारी, दुकानदार व स्वयंरोजगार करणाऱ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा किमान 3000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे.
तसेच यायोजनेअंतर्गत नोंदणी करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, लाभार्थीने नाॅमिनी केलेल्या व्यक्तीला ( वारसाला) अर्जदाराच्या पेन्शनपैकी 50 टक्के रक्कम कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून दिली जाणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
पॅन कार्ड, आधार कार्ड, आणि जन-धन खाते क्रमांक असणे आवश्यक आहे.
योजनेसाठी नियम व अटी
राष्ट्रीय पेन्शन योजनेत नोंदणी करण्यासाठी व्यावसायिकाची वार्षिक उलाढाल दीड कोटी किंवा त्यापेक्षा कमी असायला हवे. तसेच 18 ते 40 वयोगटातील व्यक्ती या योजनेत नोंदणी करु शकतात
अर्ज करण्यासाठी खालील लिंक पहा
More Stories
शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा
नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
लाडोळे मार्गे वैराग ते उपळे रस्त्याची अवस्था दयनीय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल