राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे या पार्श्वभूमीवर सरकारने 10 जानेवारीपासून नवी नियमावली जाहीर केली
पहा कसे आहेत नियम ?
▪︎नव्या नियमावलीनुसार राज्यात 10 जानेवारीपासून रात्री 11 ते पहाटे पाच पर्यंत रात्रीची संचारबंदी लागू असेल
▪︎लेखी आणि स्पष्ट परवानगीशिवाय सरकारी कार्यालयात लोकांना प्रवेश नाही तसेच खासगी कार्यालयात 50 टक्के उपस्थितीची मर्यादा असेल
▪︎याकाळात लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त 50 लोकांची उपस्थिती असेल – तर अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त 20 लोकांची उपस्थिती असेल
▪︎सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमांसाठी जास्तीत जास्त 50 लोकांची उपस्थिती असेल तर स्विमिंग पूल बंद राहतील
▪︎जिम 50% क्षमतेसह उघडे, मास्क अनिवार्य. केवळ पूर्णपणे लसीकरण झालेल्या व्यक्तींना जिम मध्ये सेवा वापरण्याची परवानगी असेल.
▪︎ हेअर कटिंग सलून 50 टक्के उपस्थितीत सुरु राहणार, सलूनमध्ये कामगारांना लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक आणि सलूनसाठी रात्री 10 पर्यंतच परवानगी असेल
▪︎ मनोरंजन पार्क, प्राणी संग्रहालय, म्युझियम बंद राहतील तर शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स 50 टक्के क्षमतेनं सुरु राहतील तसेच चित्रपटगृहे, नाट्यगृह सुद्धा 50 टक्के क्षमतेनं सुरु राहतील
▪︎शाळा, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील . मात्र 10 वी, 12 वी च्या परीक्षा बोर्ड नियमावलीनुसार होतील तसेच शाळेतील प्रशासकीय कामे सुरु राहणार तसेच तारीख जाहीर झालेल्या सर्व परीक्षा होतील
More Stories
लायन्स क्लब दहा ऑक्सी पार्क करणार, बार्शीत रविवारपासून सुरुवात
श्री. शि. शि. प्र. मंडळ निवृत्त कर्मचारी सेवाभावी संस्था बार्शीच्या वतीने मोफत आरोग्य मार्गदर्शन शिबीर संपन्न
जगदाळे मामा हॉस्पिटलमधील ट्रॉमा युनिटच्या ‘कॅज्युअलटी (तातडीची आरोग्य सेवा) लोकार्पण सोहळा व सुपरस्पेशालिटी ओ.पी.डी. इमारतीचा भूमिपूजन समारंभ