यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ,बार्शी संचलित अभिनव माध्य.व उच्च माध्य.विद्यालय येथे प्रधानमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास (मोफत प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत) – कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग,महाराष्ट्र शासनाचा “नर्सिंग कोर्स प्रशिक्षण मार्गदर्शन” कार्यक्रम संपन्न झाला.
१. Advance Care Support
२. Sample Collection Support
या विषयी तसेच इतर आवश्यक आरोग्य शिक्षण या विषयी समन्वयक-मा.डॉ.सौ.श्वेतल सोमाणी-मॅडम (सोमाणी हॉस्पिटल,बार्शी तथा उपाध्यक्षा:इनरव्हील क्लब,बार्शी) तसेच मा.श्री.प्रा.डॉ.दत्तात्रय बारबोले,सर (शं.मोहिते महाविद्यालय,अकलूज) यांनी सविस्तर-महत्वपुर्ण मार्गदर्शन केले.
सुरूवातीस सरस्वती व कै.आण्णांच्या प्रतिमा पुजनाने प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरूवात झाली. पुढे मान्यवरांचा स्वागत-सत्कार संपन्न झाला.
प्रास्ताविकात श्री.संतोष घावटे-सर यांनी हे कोर्सेस ग्रामीण भागासाठी किती गरजेचे आहेत. कोर्सेसनंतर हमखास JOB, कामाच्या अनेक संधी या बाबींवर सविस्तर आढावा मांडला.
कार्यक्रमास इनरव्हील क्लब,बार्शीच्या अध्यक्षा मा.सौ.मंजू झंवर-मॅडम, CCCC मा.सौ.प्रमोदिनी कोठारी-मॅडम, खजिनदार मा.सौ.उषा सोमाणी-मॅडम, तसेच मा.श्री.भरत पाटील-सर,अकलूज, यशोदा/राजीवस्मृती शिक्षण संस्थेचे प्रतिनिधी-समन्वयक मा.श्री.मोहन लोहार-सर, प्रशाला प्राचार्य श्री.व्हि.डी.क्षीरसागर-सर,श्री.अंकुश बारबोले-सर तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद व बहुसंख्येने कोर्स चे विद्यार्थी-विद्यार्थिनी व प्रशालेतील वरच्या वर्गातील मुले-मुली हजर होते.
शेवटी प्रशाला प्राचार्य श्री.व्हि.डी.क्षीरसागर-सर यांनी प्रशिक्षणाविषयी मार्गदर्शन करून सर्व मान्यवरांचे आभार मानले.
यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ,बार्शी व राजीवस्मृती बहुउद्देशीय शिक्षण संस्था,बार्शी चे संस्था अध्यक्ष आदरणीय श्री.अरूण (दादा) बारबोले या Skill Development कोर्सेस चे प्रमुख मार्गदर्शक आहेत अशी माहिती प्रसिद्धि विभाग प्रमुख श्री.संतोष घावटे-सर यांनी दिली.
More Stories
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत
महाराष्ट्र विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती धावणे के.डी.मॅडम यांना ‘लायन्स क्लब बार्शी रॉयल तर्फे राष्ट्र शिल्पकार आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान
बार्शीत रणगाडा? आमदार राजेंद्र राऊतांची कमाल..! बार्शीच्या इतिहासाला उजाळा.