धाराशिव उस्मानाबाद परिवहन विभागामार्फत विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांचे टॅक्ससेवा शुल्क आगाऊ रकमेचे असल्याने व त्याची अंमलबजावणी इतर जिल्ह्या प्रमाणे करण्यात यावी या मागणीसाठी धाराशिव शिवसेनेचे नेते सहसंपर्कप्रमुख श्री अनिलभाऊ खोचरे व शिवसेना जिल्हा प्रमुख बीड श्री अनीलदादा जगताप यांनी परिवहन मंत्र्यांना निवेदन दिले.
मुंबई येथे महाराष्ट्राचे परिवहन मंत्री व शिवसेना प्रवक्ते मा. ना. श्री. ॲड. अनिलजी परब यांची भेट घेऊन धाराशिव उस्मानाबाद जिल्हा प्रादेशिक परिवहन विभागामार्फत धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांन कडुन घेतले जाणारे ट्रॅक्स स्वरूपातील सेवाशुल्क इतर जिल्ह्यांतील परिवहन विभाग पेक्षा आगाऊ रकमेच्या असल्याने हे टॅक्स तर इतर जिल्ह्यांच्या प्रमाणे करून घेण्यात यावा याबाबत सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले.
यावेळी मंत्री महोदयांनी याबाबतीत बैठक घेऊन पुढील कारवाई करून सेवा शुल्क कमी करून देण्याचे आश्वासन दिले यावेळी धाराशिव शिवसेनेचे नेते सहसंपर्कप्रमुख श्री अनिलभाऊ खोचरे व शिवसेना जिल्हा प्रमुख बीड श्री अनीलदादा जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!