विश्व जन आरोग्य सेवा समिती, महाराष्ट्र राज्य (धाराशिव) यांनी कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व प्रजासत्ताक दिनांचे औचित्य साधून जिल्हा समन्वयक श्री.सोमनाथ कोकाटे यांनी तहसील कार्यालय वाशी येथे दिनांक 28.1.2021 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले होते.
सदर रक्तदान शिबिराचे उदघाटन श्री. नरसिंग जाधव, तहसीलदार वाशी यांचे हस्ते व सौ.रुपाली बाबासाहेब घोलप, सभापती, पंचायत समिती वाशी व श्री.नामदेव राजगुरू, गट विकास अधिकारी वाशी यांचे उपस्थितीत करण्यात आले. सदर रक्तदान शिबिराचे उदघाटन झाले नंतर श्री.नरसिंग जाधव, तहसीलदार वाशी, सौ. रुपाली बाबासाहेब घोलप, सभापती, पंचायत समिती व श्री.प्रवीण देशमुख, ग्रामसेवक यांनी रक्तदान केले व तदनंतर तहसील कार्यालय वाशी तसेच गट विकास अधिकारी वाशी कार्यालयातील कार्यालयीन तसेच क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी यांनी रक्तदान केले..सदर शिबीरामधे एकूण 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
सदर शिबीरादरम्यान कळंब च्या उपविभागीय अधिकारी श्रीमती अहिल्या गाठाळ यांनी भेट दिली.
भगवंत रक्त पेढी बार्शी जिल्हा सोलापूर चे कार्यकारी अधिकारी श्री.गणेश जगदाळे व त्यांचे सहकारी यांचे रक्त संकलन कमी विशेष सहकार्य लाभले.
More Stories
लायन्स क्लब दहा ऑक्सी पार्क करणार, बार्शीत रविवारपासून सुरुवात
श्री. शि. शि. प्र. मंडळ निवृत्त कर्मचारी सेवाभावी संस्था बार्शीच्या वतीने मोफत आरोग्य मार्गदर्शन शिबीर संपन्न
जगदाळे मामा हॉस्पिटलमधील ट्रॉमा युनिटच्या ‘कॅज्युअलटी (तातडीची आरोग्य सेवा) लोकार्पण सोहळा व सुपरस्पेशालिटी ओ.पी.डी. इमारतीचा भूमिपूजन समारंभ