ही स्पर्धा चार ते नऊ एप्रिलदरम्यान होणार असून. ज्युनिअर व सब ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड चाचणी १८ ते २० एप्रिलदरम्यान भोसरी- पिंपरी चिंचवड येथील मारुती सावजी लांगडे कुस्ती हॉलमध्ये होईल.

राज्य कुस्तीगीर परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक आज (कै.) मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्रात झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी परिषदेचे वरिष्ठ उपाध्यक्ष नामदेवराव मोहिते होते. या वेळी उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, गणेश कोहळे, हनुमंत गावडे, संभाजी वरुटे, दयानंद भक्त, सरचिटणीस प्रा. बाळासाहेब लांडगे, खजिनदार सुरेश पाटील, तांत्रिक सचिव बंकट यादव, विभागीय सचिव सुनील चौधरी, वामनराव गाते, भरत मेकाले, मुरलीधर टेकुलवार, संपत साळुंखे, शिवाजी धुमाळ, सुभाष घासे, सुभाष ढोणे, विनायक गाढवे, ललित लांडगे आदी उपस्थित होते.
या बैठकीत ६४ व्या वरिष्ठ गट गादी व मातीवरील राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताबाची लढत साताऱ्यात घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
साताऱ्यातील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात चार ते नऊ एप्रिलदरम्यान या स्पर्धा होतील, तसेच ज्युनिअर व सब ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड चाचणी स्पर्धा मारुती सावजी लांडगे कुस्ती हॉल (भोसरी-पिंपरी चिंचवड) येथे ता. १८ ते २० एप्रिलला होणार आहेत
More Stories
यशवंत विद्यालय खांडवी ता. बार्शी तील विद्यार्थ्यांची विधानभवनाला अभ्यास भेट, लोकशाहीच्या कार्यप्रणालीचा घेतला अनुभव
शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा
नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे