Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

मित्राला शेअर करा

महाराष्ट्र विद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करून यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. शि. शि. प्र. मंडळाचे सचिव श्री पी.टी. पाटील होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे खजिनदार श्री. जयकुमार(बापू)शितोळे व संस्था सदस्य माजी प्राचार्य श्री. सी.एस.मोरे सर व श्री. बी.के भालके सर हे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे ,यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष पी.टी पाटील यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या जीवन कार्यावर विचार व्यक्त केले. प्रमुख पाहुणे शितोळे बापू यांनी यशवंतरावांच्या जीवनपट उलगडून दाखवला विद्यार्थी अमित दास यानेही यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल माहिती सांगितली.

कार्यक्रमानिमित्त विद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजित करण्यात आले पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले या स्पर्धांमध्ये

निबंध स्पर्धा-
प्रथम क्रमांक – कु. सायली सतीश शिंदे इ.१० वी तु-अ
द्वितीय क्रमांक- कु. साक्षी महादेव संसारे इ.१० वी अ
तृतीय क्रमांक – विभागून
1- कु.अंकिता बिभीषण गायकवाड इ.१० वी -क
2- कु. सोफिया सादिक पठाण इ. १०वी क
3- कु. गौरी संदिप बळी इ.१० वी ह
रांगोळी
1- कु.पल्लवी भोसले- १०.अ
2- कु.आदिती बंडगर -१०.अ
3- कु.गार्गी सातपुते-१०.ब
मार्गदर्शक शिक्षिका(रांगोळी)-श्रीमती पवार मॅडम व
यशवंतराव चव्हाण यांचे अप्रतिम चित्र रेखाटल्या बद्दल श्री लांडगे एस. एम. सर यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनीनी यशवंतराव चव्हाण यांचे रांगोळी मध्ये उत्कृष्ट पोर्ट्रेट साकारले ही रांगोळी साकारणाऱ्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.

कलाशिक्षक एस एम लांडगे यांनी काढलेले फलक चित्र

या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन विद्यालायाचे मुख्याध्यापक श्री चव्हाण जी ए.सर यांनी केले या वेळी प्रा. एल. डी. काळे प्रा. किरण गाढवे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री आनंद कसबे सर यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती पवार मॅडम यांनी केले.

LIVE संस्थेच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन