राज्यात एकूण २८ हजार ग्रामपंचायती आहेत त्यातील १४ हजार ग्रामपंचायतींचा कारभार महिला सरपंच योग्य रीतीने सांभाळत आहेत.
कुटुंबाचा सांभाळ करीत गावचा कारभार पाहणाऱ्या महिला सरंपचांना गावासाठी आता राज्य सरकारकडून दरवर्षी दहा लाखांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार
वित्त विभागाकडे प्रस्ताव
ग्रामविकास विभागाने प्राथमिक स्वरूपात ही योजना तयार केली असून आता ती वित्त व नियोजन विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.
त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही योजना ठेवली जाईल आणखी या योजनेला नेमके कोणाचे नाव द्यायचे हे अजूनही निश्चित झालेले नाही.
ग्रामविकास विभागाने या योजनेचा प्रस्ताव तयार केला असल्याने महिला सरपंचाना गावचा विकास करण्यासाठी याचा नक्कीच फायदा होणार आहे.
More Stories
कृषी पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार
नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान; आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
वृक्ष संवर्धन समिती बार्शी च्या “वृक्ष संवर्धन दिनदर्शिका २०२५” चा प्रकाशन सोहळा संपन्न