सोलापूर, दिनांक-3 :-अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान अन्नधान्य पिकेव खाद्य तेल अभियान गळीतधान्य पिके सन 2024-25 अंतर्गत रब्बी हंगामात पिके प्रात्यक्षीकेतसेच प्रमाणित बियाणे वितरण या बाबींचे नियोजन करण्यात आलेले आहे.
या करीता चालू वर्षीहरभरा, गहू या पिकाचे महा डीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या शिर्षकाखाली बियाणे घटकाचालाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पिकेप्रात्यक्षीके ही बाब शेतकरी गटामार्फत राबविले जाणार आहेत.
पिक प्रात्यक्षीकासाठी एकाशेतकऱ्यांस 40 आर (1 एकर) क्षेत्र मर्यादेत निविष्ठा स्वरूपात अनुदान उपलब्ध करून दिलेजाणार आहे.
प्रमाणीत बियाणे वितरणासाठीएका शेतकऱ्याला आवश्यक असणाऱ्या बियाण्यांचा 2 हेक्टर मर्यादेत लाभ देय असणार आहे. यानिविष्ठांचा पुरवठा करण्याकरीतालाभार्थींची निवड महा डीबीटी पोर्टलवर दि.6 ऑक्टोबर 2024 पर्यंत बियाणे, औषधे व खतेया टाईल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील. तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी
https://mahadbt.maharashtra.gov.in/
या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभघ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.
More Stories
‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ या मतदान जनजागृतीचा उद्या राज्यस्तरीय शुभांरभ
गोरोबा काकांच्या पालखी सोहळ्याचे ” ३ नोव्हेंबरला ” पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
बार्शीचे सुदर्शन शिंदे यांची थेट जिल्हा न्यायाधीशपदी निवड, मेहनतीचं फळ मिळाल