Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > सुवर्ण दिन, सुवर्णक्षण शिवराज्याभिषेक दिन

सुवर्ण दिन, सुवर्णक्षण शिवराज्याभिषेक दिन

सुवर्ण दिन, सुवर्णक्षण शिवराज्याभिषेक दिन
मित्राला शेअर करा

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४८ व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त सालाबादप्रमाणे या वर्षी देखील जय शिवराय प्रतिष्ठान कडून अठरा पगड जाती व बारा बलुतेदार मावळ्यांकडून पवित्र नद्यांच्या पाण्यानी जलाभिषेक करण्यात आला.

त्याच बरोबर मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून जय शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती महाराजांना मानवंदना देण्यात आली तसेच भगव्या ध्वजाचे पूजन करून मिठाई वाटप करून शिवराज्याभिषेक मोठ्या उत्साहात संपन्न झाला
या वेळी शिवभक्त व जय शिवराय प्रतिष्ठान सदस्य उपस्थित होते