सोलापूर: खरीप हंगाम 2022 च्या अनुषंगाने खते व बियाणे निविष्ठा उपलब्धता, खरेदी व दराबाबत काही अडचणी उद्भवल्यास जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात तक्रार निवारण कक्षाची स्थापन करण्यात आली असून जिल्ह्यातील निविष्ठा विक्रेते व शेतकरी बांधवानी आपल्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी 8446532173 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.
कृषी कार्यालयाला खते व बियाणे निविष्ठा उपलब्धतेसाठी अडचणी येत असून त्याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी, दूरध्वनी, इमेल व समक्ष पत्राद्वारे प्राप्त होत आहेत. कामाची व्याप्ती पाहता सर्व तक्रारीचे निवारण करण्यास विलंब होत आहे, असे निदर्शनास आले आहे.
More Stories
राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’
धाराशिव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ समिती प्रमुखांनी दिले प्रशिक्षण
बार्शी येथे चर्मकार समाज वधूवर सुचक मेळावा संपन्न