बार्शी- दिनांक २७/०८/२२ वार शनिवार रोजी महाराष्ट्र विद्यालयामध्ये शिकत असलेला चि. हर्ष निशांत बेणारे याचा थायलंड येथील यशाबद्दल संस्थेचे सचिव पी.टी. पाटील, संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे, संस्थेचे कार्यकारिणी सदस्य श्री दिलीप रेवडकर, श्री व्ही. एस. पाटील, श्री सी. एस. मोरे,विद्यालयाचे प्राचार्य जी.ए. चव्हाण, उपमुख्याध्यापक आर.बी सपताळे, क्रीडाशिक्षक पी. डी. पाटील, श्री महेश माने या सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हर्ष निशांत बेणारे पहिल्यापासून स्केटिंग खेळात आपले प्राविण्य दाखवत आला आहे त्याने २०२१ वर्षी बेळगाव येथे तसेच २०२२ वर्षामध्ये गोवा,खोपोली व गुजरात या वेगवेगळ्या ठिकाणच्या नॅशनल स्केटिंग स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवलेले आहे.
तसेच दिनांक १९ ते २५ ऑगस्ट २०२२ रोजी ARSEC या इंटरनॅशनल फेडरेशन आयोजित रोलर स्केटिंग स्पर्धा थायलंड येथील पटाया येथे पार पडल्या सदर स्पर्धा प्रकारातील ५०० मीटर,७००मीटर, १०००मीटर वयोगट १३ वर्षे मध्ये वेगवेगळ्या प्रकारात गोल्ड मेडल मिळून विजेता ठरला. हर्ष च्या या यशामध्ये त्याच्या आई वडिलांचा सिंहाचा वाट आहे तसेच हर्षचे प्रशिक्षक सौ प्रियंका येडलवार मॅडम चे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
आताच मेजर ध्यानचंद सेंट्रल स्पोर्ट्स कौन्सिल इंडिया यांच्यामार्फत दिला जाणारा सुवर्णलक्ष नॅशनल स्पोर्ट्स अवॉर्ड २०२२ साठी चि. हर्ष निशांत बेणारे याची निवड झाली आहे. हा पुरस्कार २९ ऑगस्ट रोजी ठाणे येथे दिला जाणार आहे.
या यशाबद्दल हर्षचे संस्थेचे अध्यक्ष बी.वाय. यादव, उपाध्यक्ष एन.एन. जगदाळे,सचिव पी.टी.पाटील, सहसचिव ए.पी.देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, सर्व कार्यकारिणी सदस्य, सर्व संस्था सदस्य, विद्यालयाचे प्राचार्य जी.ए. चव्हाण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
More Stories
सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय, दुचाकी मालिका सुरू- आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन
‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ या मतदान जनजागृतीचा उद्या राज्यस्तरीय शुभांरभ
कार्यकर्त्यांनी स्वता उमेदवार समजून जोमाने कामाला लागावे. आ. राणाजगजितसिंह पाटील