Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > कृषी व पशुसंवर्धन > प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ई-केवायसीसाठी 31 जुलैची मुदत

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ई-केवायसीसाठी 31 जुलैची मुदत

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ई-केवायसीसाठी 31 जुलैची मुदत
मित्राला शेअर करा

सोलापूर: जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांनी 31 जुलै 2022 पर्यंत ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन पीएम किसान योजनेच्या नोडल अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार सोलापूर यांनी केले आहे.

तालुका नोडल अधिकारी तथा तहसीलदार यांनी कृषि विभाग व ग्रामविकास यंत्रणा यांच्याशी समन्वय साधून जिल्ह्यामध्ये विशेष जनजागृती मोहीम राबवावी. पी.एम किसान पोर्टलवरील नोंदणीकृत सर्व पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया 31 जुलै 2022 पर्यंत पूर्ण करावी. विहित मुदतीत ओटीपी बेस्‌ड किंवा बायोमॅट्रीक प्रणालीद्वारे

https://pmkisan.gov.in/aadharekyc.aspx

या पोर्टलवरील पर्यायामार्फत तत्काळ पूर्ण करण्याचे आवश्यक नियोजन करावे. योजनेपासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही श्रीमती पवार यांनी केल्या आहेत.