छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव 2025 निमित्त ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सायकल बँकची स्थापना करून महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथील गरजू विद्यार्थिनी पाच सायकलीचे वितरण महाराष्ट्र विद्यालयात करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी अनिलजी बनसोडे साहेब प्रमुख पाहुणे म्हणून बार्शी टेक्सटाईल मिलचे जनरल मॅनेजर अजय जी बोरवणकर, प्राचार्य गुंड सर, मुख्याध्यापिका श्रीमती के. डी. धावणे मॅडम उपमुख्याध्यापक आर. बी. सपताळे सर, ओन्ली समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी, संस्थेचे सचिव विजयकुमार जी दिवाणजी व इतर मान्यवरांच्या उपस्थित सायकल वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी महाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनीने छत्रपती शिवाजी महाराजा वरील त्यांचे विचार, त्यांची रणनीती, कौशल्य, स्त्रियांचा सन्मान, नीतिमूल्य, अठरापगड जातीला घेऊन स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील आशा अनेक प्रसंगातून छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र विद्यार्थ्यांनी आपल्या मनोकातून व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिलजी बनसोडे यांनी महाराष्ट्र विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले बार्शी शहरात ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था ही तळागाळातील व गरजू लोकापर्यंत जाऊन काम करते त्यामध्ये रक्तदान शिबिर, महिलांचा सन्मान, आदर्श शिक्षक पुरस्कार, कर्णबधिर विद्यार्थ्यांना श्रवण यांचे वाटप, गुरांना चारा वाटप, महापुरुषांच्या जयंती निमित्त ही संस्था अनेक उपक्रम राबवत असते.

यावेळी त्यांनी महाराष्ट्र विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांनीना सायकल वाटप करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे अशी भावना व्यक्त केली संस्थेचे सहसचिव नागनाथ सोनवणे यांनी संस्थेच्या कार्य बद्दल माहिती दिली यावेळी संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी, सचिव विजयकुमार दिवाणजी, सहसचिव नागनाथ सोनवणे, खजिनदार मानकोजी ताकभाते, प्रा. चंद्रकांत उलभगत सर, रतिकांत हमने सर, सुरेंद्र स्वामी, सचिन मस्के सर, अजय तिवारी, सागर घंटे, सुनील नवले, प्रतीक खंडागळे, सायरा मुल्ला मॅडम, कोमल वाणी, सुजाता अंधारे,सारिका जाधवर, रेखा सुरवसे, रागिनी झेंडे, रेखा सरवदे, पत्रकार भगिनी राजश्री गवळी मॅडम, पोलीस जाणीव सेवा संघाच्या भाग्यश्री घोडके मॅडम, अलका हाडगे मॅडम, अनुसया आगलावे, मोनिका सोनवणे आशा स्वामी, सुनिता गायकवाड, त्रिशाला मिसाळ, पार्वती जाधवर, हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. एन. कसबे सर यांनी केले सर्वांचे आभार श्रीमती एस. एल शिंदे मॅडम यांनी मानले.
More Stories
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ
संत गोरोबाकाका मंदिराची प्रस्तावित नवीन कमान महाद्वाराची जागा बदलण्याची तेर ग्रामस्थांची मागणी