Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > व्हायरल व्हिडिओतील त्या व्यक्तीला आनंद महिंद्रा यांनी दिली नोकरीची ऑफर

व्हायरल व्हिडिओतील त्या व्यक्तीला आनंद महिंद्रा यांनी दिली नोकरीची ऑफर

मित्राला शेअर करा

उद्योगपती आनंद महिंद्र हे अनेकवेळा गरजूंना मदत करताना दिसून येतात. विशेषतः वाहनांच्या संदर्भातील व्हायरल विडिओ ट्विटर वरती शेअर करत त्याची स्वतः दखल घेत गरजूंना मदत करतात.

व्हिडीओ

आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओत दिसणाऱ्या दिव्यांग व्यक्तीला आनंद्र महिंद्रा यांनी मोठी मदत दिली आहे.

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे, ‘मला माझ्या टाईमलाईनवर हा व्हिडीओ मिळाला. या व्हिडीओबद्दल मला फारशी माहिती नाही. हा व्हिडीओ किती जुना आहे आणि कुठला आहे, याबद्दल कोणतीही माहिती नाही. पण मला या माणसाला पाहून आश्चर्य वाटते’,असं ते म्हणाले आहेत.

‘या माणसाने त्याच्या प्रतिकूल परिस्थितीचा सामनाचं केला नाही. तर तो त्याच्याकडे जे आहे त्याबद्दल समाधानी आहे. राम या व्यक्तीला महिंद्रा लाॅजीस्टीक च्या लास्ट माईल डिलीव्हरी या व्यवसायात नोकरीवर घेता येईल का?’ असा प्रश्न विचारतं महिंद्रांनी या व्यक्तीला नोकरीची ऑफरचं दिली आहे.

आनंद महिंद्रा यांनी याआधीही अनेकांना मदत केल्या आहेत. ते अशा गरजू किंवा होतकरू लोकांचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. याआधी त्यांनी साताऱ्याच्या दत्तात्रय लोहार यांनी मोटारसायकल इंजिन पासून जीप तयार केली होती याची ही दखल आनंद महिंद्रा यांनी घेतली व त्यांना महिंद्रा बोलेरो देण्याची घोषणा केली होती. लोहार यांनी घरच्या घरी जुगाड जिप्सी बनवली होती. तसेच टाकाऊ प्लास्टिक बॉटल, व वेस्ट प्लास्टिक बॅग पासून बूट तयार करणाऱ्या तरुणाच्या स्टार्टअप साठी मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती.