बार्शी: विवेकांद केंद्र कन्याकुमारी, शाखा बार्शी व यशराज बहुउद्देशीय व संशोधन संस्था बार्शी यांच्या सयुक्त विद्यमाने शहरात भगवंत मंदिर, शनि मंदीर, विविध ठिकाणी गरजूनां ब्लँकेट वाटप करण्याचा उपक्रम राबवण्यात आला.
या कार्यक्रमा च्या प्रसंगी जेष्ठ पत्रकार कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश गोडसे आपल्या भाषणात म्हणाले की मोठ्या लोकांनातर सगळ्याच सुविधा असतात.पण समाजाची खरी गरज ओळखून या संघटनेने जे आज ब्लँकेट वाटपाचे कार्य केले .त्याचे कराव तेवढे कौतुक कमी आहे.
शहरामध्ये वाढती थंडी बघता ज्या गरजूंना याची गरज आहे.ती ओळखून या संघटनेने मायेची उब देण्याचे काम केले आहे व सामाजिक बांधिलकी जपली अशा शब्दात या संघटनेचे कौतूक केले.तसेच कार्यक्रमा च्या प्रसंगी माझा न्यूज चे संपादक विनोद ननवरे, व्यापारी कडगंजी व अनेक मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्था अध्यक्ष विनोद कबाडे तसेच त्यांचे इतर सहकारी महेश महामुनी आप्पासाहेब नायकोजी , शंकर ढाळे ,महेश वाघमारे सुर्दशन अग्निहोत्री,अमोल मस्तुद,संजय निरंजन, अमृता रंगदाळ आदींनी परिश्रम घेतले.
More Stories
महाराष्ट्र विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती धावणे के.डी.मॅडम यांना ‘लायन्स क्लब बार्शी रॉयल तर्फे राष्ट्र शिल्पकार आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान
बार्शीत रणगाडा? आमदार राजेंद्र राऊतांची कमाल..! बार्शीच्या इतिहासाला उजाळा.
हनुमान विद्यामंदिर, कव्हे ची यशाची परंपरा कायम