भोसरे येथील के. एन. भिसे आर्ट्स, कॉमर्स अँड विनायकराव पाटील सायन्स कॉलेज, विद्यानगर या महाविद्यालयामध्ये २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी ऑनलाईन विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. पाटील उपस्थित होते. तर प्रमुख वक्ता म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रदीप जगताप उपस्थित होते. त्यांनी संविधान जागरूकता :काळाची गरज या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शना मध्ये वक्त्यांनी भारतीय संविधानाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा आढावा घेतला. संविधान सभेमध्ये असलेल्या विविध समित्या व त्या समित्यांमध्ये झालेल्या साधक-बाधक चर्चा याचा आढावा घेतला.
संविधानाची प्रस्तावना व तिचे न्यायालयीन महत्व यांची माहिती उपस्थितांना दिली. नागरिकत्व, मूलभूत हक्क, लोकशाही व तिची मुल्ये याबाबत सखोल माहिती दिली. कायदेमंडळ, कार्यकारीमंडळ, न्यायमंडळ या बाबींवर प्रकाश टाकला. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता इत्यादी संकल्पना समजावून दिल्या. सध्याचे राजकारण व संविधान या अनुषंगाने वक्त्यांनी मांडणी केली.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. आर. आर. पाटील यांनी संविधानातील आदर्श तत्वे प्रत्येकाने आमलात आणली तर भारत पृथ्वीवरील स्वर्ग होईल असा आशावाद व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राज्यशास्त्र व राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. डॉ. अतुल कदम यांनी केले. आभार आय. क्यू.ए.सी. समन्वयक प्रा. डॉ. सचिन लोंढे यांनी मानले. या कार्यक्रमामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून प्राध्यापक, विद्यार्थी, सजग नागरीक अशा एकूण ७६ श्रोत्यांनी सहभाग नोंदवला.
More Stories
वंचितांसाठीच्या योगदानाबद्दल सचिन वायकुळे यांचा बार्शी नगरपालिकेकडून सन्मान
तेर येथील नृसिंह नवरात्र महोत्सवाच्या रक्तदान शिबिरात 67 भक्तांचे रक्तदान
मुख्यमंत्री वयोश्री योजने’अंतर्गत वृध्दांना मिळणार लाभ सामाजिक न्याय विभागाकडे अर्ज करण्याचे आवाहन