सोलापूर दि. २६- शहर जिल्हा युवा सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा २८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
“आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार" हा समज शिक्षकांनी मनातून काढून टाकावा. उगाचच आडाला गर्व असण्याची गरज नाही. मुळात मुलांना शिकवणारे आपण कोण ? शिक्षक किंवा पालकानी फक्त त्यांना दिशा देण्याचं काम केलं पाहिजे, असे प्रतिपादन जेष्ठ बाल साहित्यिक व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते राजीव तांबे यांनी केले. प्रिसिजन फाऊंडेशनच्या पासवर्ड या उपक्रमात शालेय विद्यार्थी व शिक्षकांशी ते संवाद साधत होते.
आज पासून सुरू होत असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL च्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडेल, जेव्हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) एक हजार कोटी रुपयांहून अधिक कमाई करेल.
तंत्रशिक्षणामध्ये सर्वोच मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील ' गेट ' ( अँटएप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग ) या परीक्षेमध्ये गोपाळपूर ( ता . पंढरपूर ) येथील स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या बार्शीतील स्वप्निल सुधीर काकडे सह सहा विद्यार्थ्यांनी उज्वल संपादन केले आहे. स्वप्निल काकडे याचे प्राथमिक शिक्षण महात्मा फुले विद्यामंदिर, बार्शी येथे व माध्यमिक शिक्षण महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथे झाले आहे.
बार्शी - नगरपालिका हद्दीतील थकित करदात्यांना घरपट्टी, पाणीपट्टी याचे थकित रक्कम भरण्यासाठी वेळ द्या, त्यांच्यावर जप्तीची कारवाई नको
राज्यातील सर्व माध्यमांच्या खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही. बसविणे बाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार येणारे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी सर्व खाजगी शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे ते सुरू असतील याबाबत काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येईल.असे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे केले.
जर्नालिस्ट अॅण्ड फ्रेंडस सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी दैनिक जनमत चे बार्शी तालुका प्रतिनिधी गणेश घोलप यांची निवड
पुरातत्व संग्रहालयाच्या संशोधन आणि विकासासाठी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान ( रुसा ) यांच्याकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास एक कोटी रुपयांचा प्रोजेक्ट
शासकीय नोकरीत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आरक्षित जागा आहेत. काहीवेळा बोगस प्रमाणपत्रे घेऊन याचा फायदा उठविण्याचा प्रयत्न केला जातो अगदी लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत सुध्दा असे फसवणुकीचे प्रकार उघडकीस आहेत.
बार्शी : बार्शीत यशवंतराव चव्हाण सभागृहात चार दिवस सुरू असलेल्या १८ व्या बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा समारोप 'संपल्या संवेदना, संपला संवाद' या बालनाटकाने झाला.
मावळा ग्रुप आयोजित धर्मवीर चषकावर आरसीसी बार्शीच्या संघाने कुडू येथील एनसीसी संघाचा दारूण पराभव करीत आपले नाव कोरले.
पाच क्षेत्रांमध्ये यशस्वी कामगिरी करणाऱ्या १४ युवक-युवतींची निवड !
बार्शीच्या ऐश्वर्या रेवडकर (पुस्तक : बिजापूर डायरी) व सोलापूर येथील ज्ञानेश्वर जाधवर (पुस्तक : येसन) यांची निवड करण्यात आली आहे. पुरस्काराचे वितरण खा.सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार.
बार्शी - बार्शी तालुक्यातील काटेगाव येथील शेतकरी ज्ञान मंदिर येथे शेतकरी कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेमध्ये महाडीबीटी , प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना , डाळिंब पिकावरील खोडकिडा , उन्हाळी भुईमूग , पीक व्यवस्थापन व पाणी - माती परीक्षण या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कृषी योजना या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
पुण्याच्या पश्चिमद्वारावर महापौर निधीतून साकारतंय ' हिंदवी स्वराज्य निर्मिती शिल्प
बार्शीतील वाणी प्लॉट येथील बाल चमुंनी अगळ्या वेगळ्या प्रकारे होळी साजरी करुण एकप्रकारे थोरा मोठ्यांच्या समोर तसेच समाजासमोर एक आदर्शच उभा केला आहे. या बालकांनी होळी साठी झाडांची मोठी लाकड न वापरता परिसरातील कचरा तसेच काट्या कुट्या गवरीची तुकडे वापरुन होळी साजरी केली.
बर्याच विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या cet च्या व प्रवेश प्रक्रियेच्या तारखा माहीत होत नाहीत किंवा मुदत संपल्यानंतर माहीत होतात आणि त्यामुळे प्रवेश घेता येत नाही.
गेल्या बर्याच दिवसांपासून माळशिरस, पंढरपुर, करमाळा, बार्शी, सांगोला तालुक्यांसह महाराष्ट्रामध्ये थकीत वीज बिलापोटी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करण्याचा सपाटा सुरू होता,डिपी सोडवले जात होते, अपुरा वीजपुरवठा केला जात होता अशा विविध कारणांमुळे आपली हातातोंडाशी आलेली पिके वाया जातील का काय यांसारख्या प्रश्नामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण होते
मराठवाड्यातील सततच्या पाण्याच्या दुर्भिक्षावर मात करण्याच्या दृष्टीने इस्रायल येथील राष्ट्रीय जलव्यवस्थापन कंपनी महत्वाकांक्षी अशा मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी बृहत आराखडा तयार करीत असल्याची माहिती इस्रायलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे