Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

1 min read
महिला बचतगटांद्वारे निर्मित उत्पादनांच्या विक्रीसाठी मॉल उभारणार ना. मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केलेली बचत गटासंदर्भातील ही घोषणा अकोल्यात केली असली तरी या योजनेची अंमलबजावणी संपूर्ण राज्यभर झाल्यास महिला बचत गटांना आपली दर्जेदार उत्पादने विक्रीसाठी निश्चित बाजारपेठ उपलब्ध होईल कारण बचत गटांनी तयार केलेल्या मालाची विक्री करणे हा सुध्दा मोठा प्रश्न महिलां समोर असतो या योजनेच्या माध्यमातून आर्थिक विकासाचे नवीन मार्ग निर्माण होतील.
1 min read
बार्शी दि.(प्रतिनिधी) बार्शी येथील दैनिक पुढारीचे पत्रकार गणेश गोडसे यांना एजेएफसी या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने मालाड (मुंबई) येथे झालेल्या कार्यक्रमात नवीनचंद्र सोष्टे स्मृति राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात आले.
1 min read
बार्शी शहर पोलीस ठाणे सोलापुर ग्रामीण सोलापुर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी. बार्शी शहर, सुभाष नगर, वाणी प्लॉट, कॅन्सर हॉस्पीटल परिसरातील घरफोड्या उघडकीस
1 min read
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिने स्विस ओपन 2022 स्पर्धा जिंकली. सिंधूने थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफान हिच्यावर सरळ गेममध्ये मिळावला विजय
1 min read
लोकमत पत्रकारिता पुरस्काराचा दिमाखदार सोहळा नुकताच पार पडला. दैनिक लोकमतच्या (Lokmat) वतीने पुण्यातील पत्रकारांचा लोकमत पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये पहिला डिजीटल माध्यमासाठीचा पुरस्कार ‘थोडक्यात’ न्यूज पोर्टलला प्रदान करण्यात आला.
1 min read
बार्शी टेक्स्टाईल मिल कामगार, आयटक व बार्शी कृती समिती व इंटक यांच्या वतीने आज रोजी केंद्र सरकारच्या विरोधात गिरणी कामगार, बॅक कर्मचारी तसेच घरेलू कामगार संघ, डाॅ. जगदाळे मामा हॉस्पीटल संघ, शिक्षकेतर संघ, ग्रामपंचायत संघ, ए. आय. बी. ई.ए. व राष्ट्रीय गिरणी कामगार संघ इंटक बार्शी या संघटनांच्या वतीने मोर्चा व आंदोलन करण्यात आले.
1 min read
सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने दरवर्षी जिल्हास्तरीय “ आदर्श मुख्याध्यापक " पुरस्कार देण्यात येतो. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठीच्या पुरस्कारासाठी मुख्याध्यापक सौ उज्वला दत्तात्रय व्हनाळे हि. ने. शहा कन्या प्रशाला, बार्शी ता बार्शी यांची निवड करण्यात आली
1 min read
तेर .. येथे पर्यटन महोत्सवास हेरिटेज वॉकने उत्साहात प्रारंभ करण्यात आला. आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह इतिहासप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत गावातील विविध ऐतिहासिक स्थळांची माहिती जाणून घेतली.
1 min read
इर्लेवाडी (वैराग ) शरद सरकाळे व अमोल सरकाळे बंधूंची दोन एकरावरील द्राक्षबाग शुक्रवारी आलेल्या वाऱ्याने भुईसपाट झाली. सरकाळे यांची द्राक्ष आठ दिवसात विक्रीसाठी बाजारात येणार होती अचानक द्राक्षबाग भुईसपाट झाल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
1 min read
बार्शी- पेट्रोल पंप मालकाने व पूत्राने मिळुन केली कामगारास मारहाण. बार्शी शहरातील कुर्डवाडी रोड वरील भारत पेट्रोलपंपावरील ही घटना. कामगार कृष्णा दतात्रेय सुरवसे (वय १७) रा.वाणी प्लॉट बार्शी याने बार्शी शहर पोलीस ठाण्यात पेट्रोलपंप मालक राजेंद्र तानाजी कदम व अभिषेक राजेंद्र कदम यांचा विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
1 min read
सोलापूर दि. २६- शहर जिल्हा युवा सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा २८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
1 min read
“आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार" हा समज शिक्षकांनी मनातून काढून टाकावा. उगाचच आडाला गर्व असण्याची गरज नाही. मुळात मुलांना शिकवणारे आपण कोण ? शिक्षक किंवा पालकानी फक्त त्यांना दिशा देण्याचं काम केलं पाहिजे, असे प्रतिपादन जेष्ठ बाल साहित्यिक व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते राजीव तांबे यांनी केले. प्रिसिजन फाऊंडेशनच्या पासवर्ड या उपक्रमात शालेय विद्यार्थी व शिक्षकांशी ते संवाद साधत होते.
1 min read
आज पासून सुरू होत असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL च्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडेल, जेव्हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) एक हजार कोटी रुपयांहून अधिक कमाई करेल.
1 min read
तंत्रशिक्षणामध्ये सर्वोच मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील ' गेट ' ( अँटएप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग ) या परीक्षेमध्ये गोपाळपूर ( ता . पंढरपूर ) येथील स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या बार्शीतील स्वप्निल सुधीर काकडे सह सहा विद्यार्थ्यांनी उज्वल संपादन केले आहे. स्वप्निल काकडे याचे प्राथमिक शिक्षण महात्मा फुले विद्यामंदिर, बार्शी येथे व माध्यमिक शिक्षण महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथे झाले आहे.
1 min read
बार्शी - नगरपालिका हद्दीतील थकित करदात्यांना घरपट्टी, पाणीपट्टी याचे थकित रक्कम भरण्यासाठी वेळ द्या, त्यांच्यावर जप्तीची कारवाई नको
1 min read
राज्यातील सर्व माध्यमांच्या खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही. बसविणे बाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार येणारे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी सर्व खाजगी शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे ते सुरू असतील याबाबत काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येईल.असे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे केले.
1 min read
जर्नालिस्ट अ‍ॅण्ड फ्रेंडस सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी दैनिक जनमत चे बार्शी तालुका प्रतिनिधी गणेश घोलप यांची निवड