केंद्र सरकारची नवीन योजना आता रेशन दुकानांत मिळणार घरगुती गॅस सिलेंडर
लसीकरण नोंदणीसाठी आता आधार कार्ड अनिवार्य नाही इतर ओळखपत्रांच्या साह्याने करता येईल नोंदणी
आत्मनिर्भर भारत अंतर्गत तालुकास्तरीय मार्गदर्शन शिबिर माढा तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित के.एन. भिसे आर्ट्स, कॉमर्स अँड विनायकराव पाटील सायन्स कॉलेज, विद्यानगर, भोसरे येथे नेहरू युवा केंद्र सोलापूर व सनराईज फाउंडेशन, सोनके यांच्या संयुक्त विद्यमाने आत्मनिर्भर भारत अंतर्गत आजादीचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आज मंगळवार दिनांक ०८ फेब्रुवारी २०२२ रोजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध विषयावर तालुकास्तरीय मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.
CORONA UPDATE
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णसंख्या. दि. 07 फेब्रुवारी 2022 रोजी 78 कोरोना पॉजिटिव्ह रूग्ण. 340 रूग्ण कोरोनामुक्त.
सोलापुरातील डाळिंबी आड येथे श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्यावतीने वाचनालय व अभ्यासिका बांधण्यात येणार असून त्या वास्तूचे भूमिपूजन नगरसेवक विक्रांत वानकर यांच्या हस्ते पार पडले .
CORONA UPDATEसोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णसंख्या. दि. 06 फेब्रुवारी 2022 रोजी 104 कोरोना पॉजिटिव्ह रूग्ण....
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा पूर्णवेळ सुरू राहू शकल्या नाहीत. तथापि, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुरू ठेवण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ष हे महत्त्वाचे वर्ष असल्याने राज्य मंडळाच्या इ. दहावी व इ. बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव व माहिती होण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र तर्फे विषयनिहाय प्रश्नपेढी विकसित करण्यात आल्या आहेत. या प्रश्नपेढीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले.
CORONA UPDATE
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णसंख्या. दि. 05 फेब्रुवारी 2022 रोजी 189 कोरोना पॉजिटिव्ह रूग्ण. 293 रूग्ण कोरोनामुक्त.
सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागले आहेत . शाळा सुरू करण्याबाबत पालकांनी आग्रह धरला आहे . या पार्श्वभूमीवर शासनाच्या कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सोमवार दि . ७ फेब्रुवारी २०२२ पासून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंतच्या सर्व शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या बैठकीत घेण्यात आला.
नवी दिल्ली, दि. 4 :- ‘जैवविविधता व राज्य मानके’ या विषयावरील महाराष्ट्राच्या चित्ररथास “लोकपसंती” या वर्गवारीत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील पथसंचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी झाला होता.
मुंबई,विद्यार्थ्यांनी बनवलेल्या शिल्पाचा योग्य वापर करून त्या शिल्पकलेचे जतन करावे, असे निर्देश देत सर जे जे कला महाविद्यालय परिसराची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पाहणी केली.
राज्यातील 10 वी 12 वीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार असे महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे त्या अनुषंगाने परीक्षेचे स्वरुप
CORONA UPDATE
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णसंख्या. दि. 03 फेब्रुवारी 2022 रोजी 255 कोरोना पॉजिटिव्ह रूग्ण. 575 रूग्ण कोरोनामुक्त.
स्ट्रॉबेरी म्हणाल की महाबळेश्वर हे आजपर्यंत आपण ऐकत आलो आहोत याचे कारण म्हणजे या पिकासाठी थंड हवामान आवश्यक असते परंतु उस्मानाबाद सारख्या अवर्षणप्रवण भागात श्री.वैभव विश्वंभर सूर्यवंशी रा. तोरंबा या प्रयोगशील शेतकर्यानॆ स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेत शेतकर्यांना एक आशेचा किरण दाखवलेला आहे.
CORONA UPDATE
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णसंख्या. दि. 02 फेब्रुवारी 2022 रोजी 337 कोरोना पॉजिटिव्ह रूग्ण. 383 रूग्ण कोरोनामुक्त.
महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात येणार आहे
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मंगळवारी अर्थसंकल्प सादर केला - त्यामध्ये देशातील जनतेसाठी कोणत्या महत्त्वाच्या सुविधा आणि योजनांची घोषणा करण्यात आली आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊ